उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सध्या शिगेला पोहोचलाय. निवडणुकीचे चार टप्पे पार पडलेत आणि उर्वरित टप्प्यांनंतर पुढच्या महिन्यात मतमोजणीही होईल. या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळणार की अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्षच पुन्हा सत्तेवर येणार, हा सध्या चर्चेतील मुद्दा आहे. त्याचबरोबर मायावती यांचा बहुजन समाज पक्ष कशी कामगिरी करतो हे पाहणे सुद्धा उत्सुकतेचे ठरणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ‘इंडियन एक्स्प्रेस’ने केलेल्या सर्वेक्षणातून काही वेगळेच मुद्दे समोर आले आहेत. अखिलेश यादव यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील कामांचे अनेकांनी कौतुक केले. पण त्या मुद्दयावर त्यांना मत देणार का, यावर त्यांनी थेटपणे नकारार्थी उत्तर दिले.

अखिलेश यादव उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतरच्या काळात राज्यातील गावांमध्ये वीज, पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. गावांमध्ये पोलीस यंत्रणाही अस्तित्त्वात आली आहे. पण यामुळे अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला मतदान करणार का, या प्रश्नावर बहुतेकांनी नकारात्मकच उत्तर दिले. अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगली कामगिरी केलीये. मध्य उत्तर प्रदेश, बुंदेलखंड, फैजाबाद, अयोध्या या सर्व ठिकाणी केलेल्या पाहणीमध्ये यादव समाजातील आणि मुस्लिमांनी वरील स्वरुपाची उत्तरे दिल्याचे पाहायला मिळाले. त्याचवेळी ब्राह्मण, वैश्य, ठाकूर, राजपूत, धोबी, मल्लाह या समाजातील लोकांची उत्तरे वेगळी होती.

mayawati bsp in up loksabha
बसपच्या मुस्लिम, ब्राह्मण उमेदवार यादीमुळे इंडिया आघाडीसमोर नवे आव्हान; पारंपरिक व्होट बँकेवर कसा होणार परिणाम?
INDIA bloc parties manifestoes key issues against BJP
काश्मीर, आंध्र प्रदेश, बिहारला विशेष दर्जा देण्याचे आश्वासन; इंडिया आघाडीतील पक्षांच्या जाहीरनाम्यांचे विश्लेषण
Leaders of India will have a power show tomorrow and organize a meeting at Ramlila ground in Delhi
‘इंडिया’च्या नेत्यांचे उद्या शक्तिप्रदर्शन, दिल्लीत रामलीला मैदानावर सभेचे आयोजन; विरोधकांच्या एकजुटीला बळ
Criticism of Deputy Chief Minister Devendra Fadnavis regarding Mahavikas Aghadi in bhandara
“उद्धव ठाकरेंचा आम्ही खूप वर्षे अनुभव घेतला, आता काँग्रेसला त्यांच्यासोबत…” देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले…

समाजवादी पक्षाची प्रतिमा यादवांचा किंवा मुस्लिमांचा पक्ष म्हणून तयार झाली आहे. त्याचाही प्रतिकूल परिणाम उत्तर प्रदेशमधील निवडणुकीवर होण्याची शक्यता काही जणांनी बोलताना व्यक्त केली. समाजवादी पक्षाने काही ठिकाणी दिलेले उमेदवार तुल्यबळ नसल्याचे मतही काही लोकांनी व्यक्त केले. तर अन्य काही जणांनी आम्ही भाजपलाच मत देण्याचे निश्चित केले असल्याचे सांगितले. काही ठिकाणी लोकांनी अखिलेश यांच्या कामाचे कौतुक केले. अखिलेश यादव यांच्या गावातील तलाव ते सत्तेवर आल्यानंतरच भरण्यात आले. पूर्वी तिथे गावातील मुलं क्रिकेट खेळायची, अशी टिप्पणी काही लोकांनी केली. उत्तर प्रदेशमधील निवडणुकीत यावेळी काँग्रेस आणि समाजवादी पक्षामध्ये आघाडी झाली आहे. कौटुंबिक कलहामुळेच आपण काँग्रेसशी आघाडी केल्याचे अखिलेश यादव यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. येत्या ११ मार्च रोजी उत्तर प्रदेशमधील निवडणुकीचे निकाल लागणार आहेत.