केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०१५ ची अधिसूचना लांबणीवर टाकली आहे. ही अधिसूचना १६ मे २०१५ रोजी काढली जाणार होती, पण आता ती लगेच काढली जाणार नाही असे आयोगाच्या निवेदनात म्हटले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा प्राथमिक, मुख्य व मुलाखत या तीन पातळ्यांवर होते. प्रशासकीय, परराष्ट्र, वनसेवा, पोलीस या सेवांसाठी ही परीक्षा घेतली जाते. परीक्षेच्या स्वरूपात बदल केल्याने अधिसूचना लांबणीवर टाकण्यात आली आहे. केंद्राने वादग्रस्त कल चाचणी कायम ठेवून ३३ टक्के पात्रता गुण ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता. २०११ च्या परीक्षेला बसलेल्या उमेदवाराां एक संधी जादा देण्याचाही निर्णय घेण्यात आला होता.