रशियाने युक्रेनबरोबरचा पेचप्रसंग चिघळवत ठेवला व निर्धारित मुदतीत शस्त्रे खाली ठेवली नाहीत, तर त्यांच्यावर नव्याने र्निबध लादण्यात येतील, असा इशारा अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिला आहे. रशियन विघटनवाद्यांना शस्त्रे खाली ठेवण्यास आजपर्यंत दिलेली मुदत अखेर संपली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले, की अमेरिका, युरोपीय समुदाय व इतर जागतिक भागीदारांनी रशियाकडून आणखी आगळीक केली जाण्याची शक्यता व त्याबरोबर त्या देशावर आणखी र्निबध लादण्याची शक्यता गृहीत धरावी. ओबामा व जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांची काल दूरध्वनीवर बातचीत झाली. अमेरिकेने असा इशारा दिला, की युक्रेन पेचप्रसंगाने जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसत असून जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्या बैठका वॉशिंग्टनमध्ये सुरू आहेत. अर्थमंत्री जॅकब ल्यू यांनी त्यांचे रशियन समपदस्थ अँटन सिलुआनोव यांना सांगितले, की रशियाने गेल्या महिन्यात क्रायमियाचा तुकडा तोडला. आता परिस्थिती आणखी चिघळत गेल्यास अमेरिका आणखी र्निबध रशियावर लादण्याच्या विचारात आहे.
क्रायमियाचा लचका तोडला गेल्यानंतर आता युक्रेनवर आणखी र्निबधांचा इशारा  अमेरिकेने दिला असून इस्टर्न स्टेट बिल्डिंगवर चढलेल्या विभाजनवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवल्यास त्यांना माफी देण्याचा प्रस्ताव गुरूवारी ठेवण्यात आला होता. डोनेस्क व लुगान्सक येथे सशस्त्र हल्लेखोर सरकारी इमारतीत घुसले व सार्वमताच्या दिशेने प्रयत्न केले. हंगामी अध्यक्ष ओलेकासनड्र टरचीनोव यांनी सांगितले, की युक्रेनचा सध्याचा विभाजनवादी पेचप्रसंग शांततामय मार्गाने सोडवला जाईल. लोकांनी शस्त्रे खाली ठेवली, तर त्यांच्यावर खटले चालवले जाणार नाहीत. पोलिसांनी हल्ला केला तर पेटवून देता येतील असे बंकर्स विभाजनवाद्यांनी तयार केले आहेत, डोनेस्कच्या विभाजनवाद्यांनी पीपल्स रिपब्लिकची घोषणा करून रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना पूर्वेकडील मोठे औद्योगिक ठिकाण असलेल्या डोनेस्ककडे सैन्य पाठवण्याची विनंती केली होती.