३१ भारतीय व २० अमेरिकी व्यक्तींना अटक

पाच भारतीय कॉल सेंटर्सवर हजारो अमेरिकनांना फसवल्याचा आरोप असून त्यांनी काही लोकांना ३० कोटी डॉलरला गंडा घातला आहे, असे अमेरिकेचे अंतर्गत सुरक्षा मंत्री  जेह जॉन्सन यांनी सांगितले. पाच कॉल सेंटर्सना दोषी ठरवण्यात आले असून त्यात भारतातील ३१ व अमेरिकेतील २० जणांना अटक करण्यात आली आहे. एकूण ५६ जणांना अटक करण्यात आली. त्यांनी लोकांना ३० कोटी डॉलरना गंडा घातल्याचे सांगण्यात येत आहे. अहमदाबाद येथील कॉल सेंटर्सचा त्यात समावेश असून ते अमेरिकी अंतर्गत सुरक्षा मंत्रालयातील किंवा महसूल कर्मचारी असल्याचे भासवून खोटी अटक वॉरंट काढत असत व संबंधितांकडून पसे उकळत असत.

प्राप्तिकर न भरणे व इतर कारणे दाखवून ते लोकांना धमकावित होते. अहमदाबाद येथील ज्या कॉलसेंटर्सनी हे प्रकार केले त्यात एच ग्लोबल, कॉल मंत्रा, वर्ल्ड वाइड सोल्यूशन, झोरियान कम्युनिकेशन व शर्मा बीपीओ सíव्हसेस यांचा समावेश आहे. कोषागार निरीक्षक , अंतर्गत सुरक्षा खाते, महसूल विभाग, संघराज्य व्यापार विभाग यांनी तीन वर्षांच्या चौकशीत सर्वाना दोषी ठरवले असून खोटी ओळख दाखवून धमकावण्या देत पसे उकळल्याच्या प्रकरणात शिक्षा झाल्याचे हे सर्वात मोठे प्रकरण आहे. १.८ दशलक्ष लोकांनी कर खात्याकडे या कॉल सेंटर्सच्या धमक्यांबाबत तक्रार केली होती. त्यातील ९६००  लोकांनी धमक्यांना घाबरून संबंधितांना ५ कोटी डॉलर्स दिले होते.

कॅलिफोíनयातील एका व्यक्तीकडून १३६००० डॉलर घेण्यात आले होते, असे कर खात्याचे महानिरीक्षक जे रसेल जॉर्ज यांनी सांगितले. २०१५ मध्ये ११०० लोकांनी घोटाळ्यांबाबतच्या हॉटलाईनवर याबाबत तक्रारी केल्या होत्या.