जगात दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशात मुस्लिमांनी चांगले काम केल्याची पावती देतानाच, अमेरिकेतील अनेक लोकांचे या समुदायाबाबत ‘विपर्यस्त’ मत असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे.
पाश्चिमात्य देशांतील लोकांची इस्लामबाबतची प्रतिमा ज्याप्रकारे प्रसारमाध्यमे त्यांना दाखवतात, त्यावरून तयार होते. मात्र अमेरिकेसारख्या तुलनेने कमी मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशांतील लोकांबाबत हे दाखवण्यात येत असल्याने अनेक लोकांना वैयक्तिकरीत्या मुसलमान कसा असतो याची स्पष्ट कल्पना येत नाही. त्यांना मुस्लिमांची किंवा इस्लामची प्रतिमा बातम्यांमधून मिळते, असे ओबामा म्हणाले.