बारकोड प्रणालीचा सहा दशकांपूर्वी शोध लावणारे अमेरिकी संशोधक नॉर्मन जोसेफ वूडलॅँड यांचे रविवारी अल्झायमरने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. अभियांत्रिकेचे पदवीधर असलेल्या वूडलँड यांनी १९४० मध्ये आपला वर्गसहकारी बेनार्ड सिल्व्हर यांच्यासह उभ्या आणि आडव्या पटय़ांच्या मदतीने वस्तूंची माहिती संकलीत करणाऱ्या बारकोड पद्धतीची निमिर्ती केली. तत्कालीन काळाच्या कित्येक पुढे असलेल्या या पद्धतीमुळे या दोघांना ४० च्या दशकांत १५ हजार अमेरिकी डॉलर्सची प्राप्ती झाली होती.