अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या तीन दिवसीय भारत भेटीचा आज दुपारी समारोप होत असून, तत्पूर्वी ओबामा मंगळवारी सकाळी विविध क्षेत्रातील निवडक लोकांशी संवाद साधणार आहेत. दक्षिण दिल्लीतील सिरी फोर्ट प्रेक्षागृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या संवादादरम्यान ओबामा प्रामुख्याने भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवर भाष्य करतील.
ओबामा शाळांतील निवडक विद्यार्थ्यांशीही संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमानंतर ते शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल दोघेही दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सौदी अरेबियाकडे रवाना होतील.