पृथ्वीवरुन इस्लामी कट्टरतावाद नष्ट करु असा निर्धार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. तुमचा रंग कोणताही असो, तुम्ही कृष्णवर्णीय असाल किंवा गौरवर्णीय, पण आपल्या सर्वांच्या रक्तात फक्त राष्ट्रभक्ती आहे अशी भावनिक साद घालत ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्टचा नारा दिला आहे.

अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये ‘कॅपिटॉल हिल्स’ (अमेरिकेतील संसदेचा परिसर) येथे डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यात ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. अमेरिकेतील सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश जाॅन राॅबर्ट्स यांनी त्यांना शपथ दिली. राष्ट्राध्यक्षाची शपथ घेतल्यावर ट्रम्प यांनी उपस्थितांसमोर भाषणही केले. या भाषणात ट्रम्प यांनी इस्लामी कट्टरतावाद ते अमेरिकेतील रोजगार आणि अन्य प्रश्नांवर त्यांची भूमिका मांडली.

freshly divorced emily ratajkowski starts a new trend Divorce rings what behind the rise of Divorce rings
विभक्त होणाऱ्या पती-पत्नीमध्ये वाढतोय ‘डायवोर्स रिंग’चा ट्रेंड? अमेरिकेन अभिनेत्रीने आणलेला ‘हा’ प्रकार नेमका काय आहे? वाचा
Unicorns List India ranks third
Unicorns List: अमेरिका व चीनपाठोपाठ भारत तिसऱ्या स्थानावर
a man performed amazing belly dance
Video : ‘तो’ आला, पट्टा बांधला आणि मग जो बेली डान्स केला, लोकांची नजरच हटेना, नेटकरी म्हणे, “मलायका फेल..”
america bridge collapse
विश्लेषण : अमेरिकेत ४७ वर्ष जुना पूल कसा कोसळला? किती जणांनी गमावला जीव?

आज वॉशिंग्टनमध्ये सत्ताबदल होत आहे. अमेरिकेतील जनतेला पुन्हा त्यांचे सरकार सोपवत आहोत असे सांगत ट्रम्प यांनी भाषणाला सुरुवात केली. आजपासून अमेरिका हा तुमचा देश आहे. आता या देशावर पुन्हा जनतेचे राज्य असेल असे त्यांनी सांगितले. मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांच्या उपस्थितीतच त्यांनी हे विधान केले. ओबामा आणि त्यांच्या अगोदरचे राष्ट्राध्यक्ष हे जनमताशी प्रामाणिक राहिले नाही असा त्यांच्या बोलण्याचा सूर होता. आजचा हा क्षण तुमचा आहे, इथे जमलेल्या प्रत्येकाचा, देशाच्या कानाकोप-यातून हा सोहळा बघणा-या अमेरिकी नागरिकांचा आहे असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

आमच्या सरकारवर जनतेचे नियंत्रण असेल. इतिहासात २० जानेवारी २०१७ या दिवसाची नोंद इतिहासात पुन्हा जनतेचे राज्य आले अशा शब्दात होईल. विसर पडलेल्या प्रत्येक स्त्री आणि पुरुष यापुढे दखल घेतली जाईल अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

परदेशातील नागरिकांपूर्वी अमेरिकेतील नागरिकांना रोजगारात प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. आजपासून अमेरिका फर्स्ट. देशातील प्रत्येक निर्णय कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना फायदा मिळावा यासाठी घेतला जाईल असे ते म्हणालेत. ‘अमेरिकन माल खरेदी करा आणि अमेरिकन लोकांनाच नोकरी द्या’ हाच आमचा मंत्र असेल असे त्यांनी सांगितले. भाषणात त्यांनी बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांचे आभार मानले.

शुक्रवारी  ट्रम्प यांच्यासह माइक पेन्स यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि मिशेल ओबामा हे या सोहळ्याला उपस्थित होते. ओबामा यांच्या अध्यक्षीय वाहनातूनच ट्रम्प यांचे समारंभास्थळी आगमन झाले. या सोहळ्याला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि ट्रम्प यांच्याविरूध्द यंदा निवडणूक लढलेल्या हिलरी क्लिंटन उपस्थित होत्या. याशिवाय माजी राष्ट्राध्यक्ष जाॅर्ज बुश आणि त्यांच्या पत्नी लाॅरा, जिमी कार्टर हेदेखील या सोहळ्याला उपस्थित होते.

Live Updates
23:13 (IST) 20 Jan 2017
LIVE: माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांचा व्हाईट हाऊसला अलविदा, पत्नी मिशेलसह हेलिकाॅप्टरने रवाना
22:53 (IST) 20 Jan 2017
इस्लामी कट्टरतावाद या पृथ्वीवरुन नष्ट करणार - ट्रम्प
22:51 (IST) 20 Jan 2017
अमेरिकी नागरिकांपासून हिरावलेला रोजगार परत मिळवून देणार - ट्रम्प
22:50 (IST) 20 Jan 2017
अमेरिकन फर्स्ट, पहिल्याच भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांचा नारा
22:39 (IST) 20 Jan 2017
हा क्षण तुमचा आहे, इथे जमलेल्या प्रत्येकाचा आणि अमेरिकेतील कानाकोप-यातून हा सोहळा बघणा-यांचा आहे - ट्रम्प
22:36 (IST) 20 Jan 2017
आम्ही वॉ़शिंग्टनमध्ये सत्ताबदल करत आहोत, आता जनतेला त्यांचे सरकार परत देत आहोत - डोनाल्ड ट्रम्प
22:32 (IST) 20 Jan 2017
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४५ राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
22:24 (IST) 20 Jan 2017
माइक पेन्स यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली
22:09 (IST) 20 Jan 2017
21:56 (IST) 20 Jan 2017
मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे मंचावर आगमन, ओबामा यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून आज शेवटची मानवंदना दिली जाणार.
21:55 (IST) 20 Jan 2017
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समवेत संपूर्ण कुटुंब कॅपिटॉल हिलमध्ये पोहोचले
21:36 (IST) 20 Jan 2017
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला सुरुवात, कॅपिटॉल बिल्डिंगमध्ये ट्रम्प यांचे आगमन
21:29 (IST) 20 Jan 2017
ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि हिलरी क्लिंटन उपस्थित.
21:27 (IST) 20 Jan 2017
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला विरोध, वॉशिंग्टनमध्ये ट्रम्पविरोधकांचे आंदोलन
20:53 (IST) 20 Jan 2017
डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये दाखल. शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी महत्त्वाच्या व्यक्तींचं आगमन सुरू. माजी राष्ट्राध्यक्ष जाॅर्ज बुश त्यांच्या पत्नी लाॅरा बुश यांच्यासोबत उपस्थित. काही वेळात शपथविधी सोहळ्याला सुरूवात
19:46 (IST) 20 Jan 2017