23 September 2017

News Flash

व्हिडीओ व्हायरल!…निवडणूक अधिकारीच देत होते ‘कमळा’ला मत, महिलेचा गंभीर आरोप

मायावतींची समर्थक असल्याचा दावा

लोकसत्ता ऑनलाईन | Updated: March 14, 2017 6:42 PM

उत्तर प्रदेशात ईव्हीएममध्ये घोटाळा केल्याचा आरोप ही महिला व्हायरल झालेल्या व्हिडीओतून करत आहे.

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये मतदान यंत्रात ‘घोटाळा’ झाल्याची जोरदार चर्चा असताना, मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकाऱ्यांनीच ईव्हीएमवरील ‘कमळ’ बटण दाबले; तसेच भाजपला मत देण्यासाठी अधिकारी महिला मतदारांवर दबाव आणत होते, असा गंभीर आरोप एका महिलेने व्हिडीओतून केला आहे. हा खळबळजनक व्हिडीओ ‘इंडिया अगेन्स्ट बीजेपी’च्या यू-ट्युब पेजवरून अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत सहा लाखांहून अधिक जणांनी पाहिला आहे. ‘यूपी मे ईवीएम गडबडी का सबूत’ या नावाने हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

काय म्हणतेय ‘ती’ महिला!

निवडणूक अधिकारी स्वतःच ईव्हीएम मशीनवरील ‘कमळा’चे बटन दाबून मत देत होते. मतदानासाठी गेलेल्या महिलांना ते मशीन सुरू होत नाही, असे सांगत होते. पण दुसरीकडे ते अधिकारी मशीनच सुरू करत नव्हते. मतदारांवर दबाव आणून स्वतःच मतदान करत होते. कमळ या चिन्हालाच मत दिले जात होते. १०० मीटरवर कुणीही थांबू नये. पण काही लोक बिनधास्तपणे वावरत होते. चहा-पाणी सर्व काही होत होते. पोलीसही त्यांनाच साथ देत होते, असे या व्हिडीओत ती सांगत आहे. कुणाला मत देणार आहेस, असे विचारले असता, मायवतींची समर्थक असून, त्यांच्या पक्षाच्या हाजी नामक उमेदवाराला मत देणार आहे, असे ही महिला सांगत आहे.

हा पाहा व्हिडीओ

दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने ३१२ जागांवर विजय मिळवला आहे. त्यानंतर बसपच्या नेत्या मायावती यांनी ईव्हीएममध्ये गडबड केल्याचा आरोप करून पुन्हा निवडणुका घेण्याचे आव्हान भाजपला दिले होते. अखिलेश यादव आणि लालूप्रसाद यादव यांनीही मायवती यांनी केलेल्या आरोपाचे समर्थन केले आहे.

First Published on March 14, 2017 6:42 pm

Web Title: uttar pradesh election 2017 evm scam in up alleged women voter from viral video
 1. P
  Parag
  Mar 16, 2017 at 6:09 pm
  खोट्या बातम्या देऊन भाजपला बदनाम करण्यामध्ये आधीचे महामूर्ख संपादक कुमार केतकर आघाडीवर होतेच पण आत्ताच्या संपादकांनी त्या कुमार केतकरवर कडी करायची ठरवलेले दिसत आहे. ही बातमी पाहिल्यावर असे वाटले की व्हिडिओमध्ये दिसेल की कर्मचारीच भाजपला मतदान करत आहेत. प्रत्यक्षात मात्र ही महामूर्ख बाई तसे आरोप करतानाचा हा व्हिडिओ आहे. उद्या जर या बाईने मोदींवर दाभोलकरांच्या खुनाचा आरोप केला तर त्याचा व्हिडिओ दाखवतील, तिची बडबड दाखवतील आणि मथळा असेल - मोदींनी दाभोलकरांचा खून करतानाच व्हिडिओ पहा म्हणून.
  Reply
  1. P
   Prasad
   Mar 15, 2017 at 7:43 am
   वं दे मा त र मराजकीय पक्ष कोणत्याही ठरावाला जाऊ शकतात हे खरे पण मोठ्या प्रमाणावर असे करता येणे शक्य नाही. वो ट डा ल ते र हो
   Reply
   1. R
    rajendra
    Mar 15, 2017 at 12:45 am
    छान , एकूणच लोकसत्तेने आपले वृत्तपत्र विरोधी पक्षांच्या दावणीला बांधून त्यांच्या बंडलबाजीचे मुखपत्र बनविलेले दिसते ! त्यांच्या मोदीद्वेषाने पिवळ्या झालेल्या मेंदूत साधा प्रकाश पडत नाही कि हा न दाबादाबी व्हिडियो निवडणुकेच्या दिवशीच का प्रसारित झाला नाही ? जर का विरोधी नेत्यांना अश्या प्रकारच्या (लघु)शंका येत होत्या तर ते निकालापर्यंत दाबून का ठेवल्या ? आता त्यांच्या ह्या जर्द पिवळ्या शंकांचे शिंतोडे लोकसत्तेने दररोज पहिल्या पानावर फवारे मारत राहावे !!
    Reply
    1. R
     rajendra
     Mar 15, 2017 at 12:51 am
     छान, एकूणच लोकसत्तेने आपले वृत्तपत्र विरोधी पक्षांच्या दावणीला बांधून त्यांच्या बंडलबाजीचे मुखपत्र बनविलेले दिसते ! त्यांच्या मोदीद्वेषाने पिवळ्या झालेल्या मेंदूत साधा प्रकाश पडत नाही कि हा न दाबादाबी व्हिडियो निवडणुकेच्या दिवशीच का प्रसारित झाला नाही ? जर का विरोधी नेत्यांना अश्या प्रकारच्या (लघु)शंका येत होत्या तर ते निकालापर्यंत दाबून का ठेवल्या ? आता त्यांच्या ह्या जर्द पिवळ्या शंकांचे फवारले शिंतोडे दररोज पहिल्या पानावर पुरवत लोकसत्तेने पुढील निवडूणुकीपर्यंत धन्य राहावे !
     Reply
     1. J
      jai
      Mar 15, 2017 at 5:26 am
      I am not BJP suppporter..समजा हे खरा असेल ..तर असे किती ठिकाणी करू शकतात..आदरणीय यादव जी च्या राज्य मध्ये विरोधी पक्ष असे करू शकेल का ते सुद्धा ३२४ ठिकाणी..अखिलेश आणि आदरणीय मायावती यांचे चेले हे सगळे होऊन देतील का..याच्या आधी या सर्व पक्षांना UP मध्ये बहुमत मिळाले होते तेव्हा काय..आदरणीय केजरीवाल यांच्या पक्षाला दिल्ली मध्ये प्रचंड बहुमत मिळाले त्याचे काय..अरे काही तरी दर्जा ठेवा पत्रकारितेचा.. बहुमताचा आदर करणे शिका
      Reply
      1. सचिन पाटील
       Mar 14, 2017 at 2:11 pm
       लोकसत्ताने या विरुद्ध आवाज उठवावा. मूर्ख विरोधक भाजपाला विरोध करण्याऐवजी संस्थात्मक लोकशाहीचीच्याच मुळावर उठलेत. हे असाच सुरु राहिले तर भारताचा अफगाणिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही.
       Reply
       1. S
        Sandip Shilimkar
        Mar 20, 2017 at 2:03 pm
        जब वोटींग हो रहा था तो इस औरत ने बसपा के कार्यकर्ताओ को क्यों नही बताया । वोटींग सेंटर से १०० मी दुरी पर हर एक पार्टी के पोलींग एजंट बैठे होते है जो मतदाताओं को मतदान प्रक्रिया मे मदद करते है । यह औरत १०० % झुठ बोल रही है उसकी जाँच होनी चाहीएँ ।
        Reply
        1. S
         Shashank
         Mar 15, 2017 at 6:17 am
         असे लाखो साक्षीदार पैसे चारून कुणीही उभे करेल.. ईव्हीएम मशीन मधील गडबड किंवा असे काही होतानाच व्हिडीओ कुणाकडेच नाही, यातच खरी गोम आहे.
         Reply
         1. S
          samir
          Mar 16, 2017 at 5:09 am
          पंजाबच्या इविमा मशीनमध्ये काहीच घोटाळा नाही कसा? भारतात महामूर्ख लोक भरपूर आहे म्हणून काँग्रेस ६० वषे होती.
          Reply
          1. S
           Surendra Gaidhani
           Mar 14, 2017 at 4:33 pm
           लोकसत्ताने योग्य ती शहानिशा करून बातम्या द्याव्यात. सवंग बातम्या छापून आपली विश्वासार्हता कमी करू नये.
           Reply
           1. S
            swanand
            Mar 15, 2017 at 8:39 am
            होवाहतूक पोलि ५०/- देणे हाही भ्रश्टाचारच आहे
            Reply
            1. U
             uday
             Mar 15, 2017 at 4:17 am
             इवीएम मशीन मॅनयपुलेट होवू शकते हे वैज्ञानिक सत्य आहे.
             Reply
             1. उर्मिला.अशोक.शहा
              Mar 15, 2017 at 12:54 am
              वंदे मातरम- इलेक्शन होऊन सप्ताह उलटल्यावर व्हिडिओ व्हायरल ? आणि लोकसत्तात ला जग येणे ? ज्या कोणाला इलेक्शन बद्दल शंका असेल त्यांनी कोर्टात का जाऊ नये? इ व्ही एम च्या नावाने खडे फोडणे मुसलमान भाजप ला मते का देतील असे मूर्ख प्रश्न म्हणजे रडी चा डाव जनतेने विरोधकांना नाकारले आहे. मतपत्रिके द्वारे मतदान म्हणजे वेळ वाया जाणे,बोगस वोटिंग ला ऊत येणार करिता विरोधक वकिली करीत आहेत इलेक्शन कमिशन ने ठाम राहावे अथवा सुप्रीम कोर्टाने याचा सोक्ष मोक्ष लावावा जा ग त र हो
              Reply
              1. विनोद
               Mar 15, 2017 at 5:16 am
               बुथमध्ये शुटींग करायला बंदी असते मुर्खा !असे मतदान करणारे अधिकारी शुटींग करू देतील काय ?
               Reply
               1. विनोद
                Mar 14, 2017 at 5:04 pm
                याज्ञिधर्मिणि धर्मि पापे पापाः समे समाः।लोकास्तमनुवर्तन्ते यथा राजा तथा प्रजा॥ -- आर्य चाणक्यअर्थ - एखाद्या राज्यामधील राजा जर धर्मपालन करणारा असेल तर त्याचे प्रजाजनही धर्माचरण करतात. राजा पापी असेल तर प्रजाजनही पापी निघतात. राजा पक्षपात न करणारा असेल तर प्रजाजनही समता पाळणारे निपजतात. जसा राजा तशी त्याची प्रजा.
                Reply
                1. विनोद
                 Mar 15, 2017 at 5:17 am
                 वंदे मातरम- इलेक्शन होऊन सप्ताह उलटल्यावर व्हिडिओ व्हायरल ? आणि लोकसत्तात ला """जाग""" येणे ?जा ग ते र हो ???????
                 Reply
                 1. विनोद
                  Mar 14, 2017 at 2:36 pm
                  साम दाम दंड भेद कपट !
                  Reply
                  1. विनोद
                   Mar 16, 2017 at 5:39 am
                   एक नंबर !
                   Reply
                   1. विनोद
                    Mar 15, 2017 at 12:19 pm
                    अामदार विकत घेणार्यांना उमेदवारांचे एजंट विकत घेणे म्हणजे क्षुल्लक बाब आहे !
                    Reply
                    1. विनोद
                     Mar 15, 2017 at 5:51 pm
                     कपटी प्रतिक्रीया !
                     Reply
                     1. विनोद
                      Mar 15, 2017 at 12:15 pm
                      नका देत जाऊ अशा बातम्या !बाळाला नाही आवडत !त्याएेवजी मस्कत मधल्या हवापाण्याच्या बातम्या देत जा !
                      Reply
                      1. Load More Comments