मॅगसेसे पुरस्कार विजेते ख्यातनाम पत्रकार व हिंदूुस्तान टाईम्स व इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रांचे माजी संपादक बी. जी. वर्गीस (वय ८७) यांचे अल्प आजाराने निधन झाले.
वर्गीस यांना गेल्या महिन्यात डेंग्यू झाला होता व त्यांना थोडा ताप व अशक्तपणा होता. त्यांच्या पश्चात पत्नी जमिला व मुलगे विजय व राहुल आहेत. गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. १९६९ ते १९७५ या काळात ते हिंदुस्तान टाईम्सचे व १९८२ ते १९८६ या काळात द इंडियन एक्सप्रेसचे संपादक होते. ते इंदिरा गांधी यांचे १९६६ ते १९६९ दरम्यान माहिती सल्लागार होते, पण १९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीवर त्यांनी टीका केली होती.