विश्व हिंदू परिषदेकडून (विहिंप) सुरू असलेल्या ‘घरवापसी’ या धर्मांतर मोहिमेचा घाट अद्यापही सुरूच असून गुरूवारी ख्रिसमसच्या दिवशी ५८ जणांना विहिंपने हिंदू धर्मात घेतले. यातील जवळपास सर्वच जण ख्रिश्चन धर्मीय आहेत.
कोट्टायम जिल्ह्यातील दोन मंदिरांमध्ये विहिंपच्या पुढाकाराने हे धर्मांतर करण्यात आले. विहिंपचे जिल्हा अध्यक्ष बालचंद्रन पिलाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोनूकुन्नम मधील पुथियकाव देवी मंदिरात २० कुटुंबातील ४२ जणांना हिंदू धर्मात सामावून घेण्यात आले. तर, थिरुन्कारा मधील श्रीकृष्ण स्वामी मंदिरात इतर १६ जणांना हिंदू धर्मात घेण्यात आले. हे सर्व आपल्या मर्जीने हिंदू धर्मात परत आले असल्याचेही बालचंद्रन पिलाई यांनी सांगितले. याआधी दक्षिण गुजरातमध्ये देखील ‘घरवापसी’ कार्यक्रमात शंभर आदिवासी ख्रिश्चनांना विहिंपने पुन्हा हिंदू धर्मात घेतले. वलसाड जिल्ह्य़ातील कपर्डा तालुक्यात आर्णीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.