20 September 2017

News Flash

याकूब मेमनला वाचवण्याचा प्रयत्न करणारे ‘गांधी’ उपराष्ट्रपतीपदी कशाला हवे?: शिवसेना

गोपाळकृष्ण यांचे आडनाव गांधी असल्याने त्यांना समर्थन देता येणार नाही.

नवी दिल्ली | Updated: July 17, 2017 3:25 PM

संजय राऊत

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांच्यावर शिवसेनेने टीकेचे बाण सोडले आहेत. पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांनी याकूब मेमनला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते, अशी व्यक्ती उपराष्ट्रपतीपदावर कशाला हवी असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने गोपाळकृष्ण गांधी यांना उमेदवारी दिली आहे. गोपाळकृष्ण गांधी हे महात्मा गांधी यांचे नातू असून ते पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आहेत. गोपाळकृष्ण गांधी यांच्या उमेदवारीवर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. गोपाळकृष्ण गांधी यांनी १९९३ मधील बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला फाशीची शिक्षा होऊ नये यासाठी प्रयत्न केले होते याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधले. गोपाळकृष्ण यांचे आडनाव गांधी असल्याने त्यांना समर्थन देता येणार नाही. याकूबच्या फाशीला विरोध करणारे गांधी तुम्हाला उपराष्ट्रपतीपदी चालतील का असा सवाल त्यांनी विचारला. अशा व्यक्तीला उमेदवारी देणाऱ्यांचे मानसिक संतुलन तपासावे असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला. सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक म्हणजे संकुचित दृष्टीकोन आणि धर्मांध शक्तीविरोधातील लढा असल्याचे म्हटले होते. याचा समाचार घेताना राऊत म्हणाले, संकुचित दृष्टीकोनाची व्याख्या काय आहे हे सोनिया गांधींनी सांगावे. त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची चिंता करु नये. रामनाथ कोविंद यांचा विजय निश्चित आहे असा दावाही राऊत यांनी केला.

मुंबईतील १९९३ मधील बॉम्बस्फोट प्रकरणात याकूब मेमनला फाशीची शिक्षा झाली होती. याकूबला फाशी देण्यास गोपाळकृष्ण गांधींनी विरोध दर्शवला होता. त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पत्र लिहून फाशी रद्द करण्याची मागणी केली होती.

First Published on July 17, 2017 3:25 pm

Web Title: vice president election 2017 shiv sena sanjay raut opposed gopalkrishna gandhi yakub memon mumbai serial blast
 1. M
  Manohar V.
  Jul 17, 2017 at 10:35 pm
  खूप दिवसांनी शिवसेनेने एक चांगला विचार मांडला आहे. अल्पसंख्यांकांचा अनुनय करणारा उमेदवार आम्हाला उपराष्ट्रपती पदासाठी अजिबात नको. ह्या गांधींना कुठच्या निकषावर उमेदवारी दिली हे ढोंगी धर्मनिरपेक्ष गांधी फॅमिली(RAGA व सोनिया) व आक्रस्ताळ्या ममताने आम्हा भारतीय जनतेला समजावून सांगावे. ह्या मर्कट उमेदवारामुळे कँग्रेस, ममता व इतर विरोधी पक्षीयांनी आपले परत हसे करून घेतले आहे हे मात्र निश्चित.
  Reply
  1. S
   Sanjay More
   Jul 17, 2017 at 8:51 pm
   अभिनंदन राऊत साहेब, प्रथम च आयुष्यात काही तरी चांगले आणि बरोबर बोललात... मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन...
   Reply
   1. A
    Akshay
    Jul 17, 2017 at 7:26 pm
    याकूब मेनन ईतकच गुन्हेगार आतंकवादी संजय दत्त ला सोडविणारे भाजप चालतो आणि हाफिज सैद ला भेटणारे चालतात.हाफिज सैद ला सोडून देणाऱ्यासोबत सत्ता चालते ?
    Reply
    1. R
     rashtra dharma
     Jul 17, 2017 at 6:21 pm
     Gopalkrishna Gandhi ko Rashtrapati pad k liye UPA ummidwar hote to jada aschha hota!Congress der se hi sahi ran naitik faisla liya hai....UPA ko bahot bahot shubhkamnaye....
     Reply
     1. U
      Ulhas Patil
      Jul 17, 2017 at 6:17 pm
      माझा मिस्टर संजय राऊत ह्यांच्या मुद्याला संपूर्णपणे पाठिंबा आहे. ज्या माणसाने एका देशद्रोही माण वाचवण्याचे कार्य केले आहे त्याला उपराष्ट्रपती पाद् काय कोणतीही पब्लिक पोसिशन भारण्याचाच काय, पण कोठलीही निवडणूक लढविण्याचा काहीस अधिकार नाही. आणि जर का तो अशी निवडणूक लढवायला तयार झ्हालाच तर त्याला कोणीही मात देवू नये. हे माझे प्रांजळ मात आहे.
      Reply
      1. N
       Nitin Deolekar
       Jul 17, 2017 at 5:47 pm
       गांधी नको राजे शिवाजी हवे!! भारताच्या नोट-वर!! तरच तरुणाना प्रेरणा मिळेल!! पाक-चीनला धडकी भरेल!! महात्मा?? गांधी साहेब हे एक वैचारिक अतिरेकी होते !! यात शंका नाही. स्वतंत्र-नंतर पाकिस्तान-विरुद्ध, निजाम-विरुद्ध, गांधी-जिचे शिष्योत्तम नेहरू-पटेल यांनी सशस्त्र सेने वापरली !! अ-हिंसा तत्व नव्हे !! हिंदी-चिनी भाई भाई फसल्यावर चीनने भारतावर १९६१ मध्ये चक्क हल्ला केला!! तेंव्हा तर नेहरू सायबाचा बोबडीच वळली?? असो. थोर गांधीने भारतात लोकशाहीचा सर्व-प्रथम निर्घृण खून केला?? १९३७-३८ मध्ये नेताजी-सुभाष बाबू गांधीच्या उमेदवाराला हरवून बहुमताने निवडून आले होते !! पण गांधीने अ- कार पुकारला, आणि नेताजींना राजीनामा देण्यास भाग पाडले !! तीच पद्धत पुढे दिल्लीने राज्यांच्या मुख्यमंत्रांविरुद्ध वापरली !! तरी नथुरामने गांधींना मारले हि फार मोठी चूक केली?? त्यामुळे गांधी हुतात्मा झाले आणि त्यांचे महत्व अति वाढले !! त्यांच्या गंभीर घोड-चुका कोणी लक्षात घेत नाही?? मुस्लिम-दलित यांचे अतिरेकी लांगुन-चलन हि तर फार फार मोठ्ठी चूक.. त्यामुळे समान नागरी कायदा झाला नाही? मुस्लिम महिऊलांवर घोर अन्याय झाला.
       Reply
       1. S
        SANDHYA SALVI
        Jul 17, 2017 at 5:13 pm
        sanjay raut tumchya mulal सैनिकी म्हणून बॉर्डर वर लढायला पाठवा उगाच बडबड काई कामाची
        Reply
        1. R
         Ravi
         Jul 17, 2017 at 4:13 pm
         Congress need to understand that the magic of word "Gandhi" , is nearly over for good. They need to find something else to fool .
         Reply
         1. V
          vijay vaidya
          Jul 17, 2017 at 4:01 pm
          राऊत आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी चांगल बोलला नाहीतर तोंड उघडलं की............................
          Reply
          1. P
           pappu
           Jul 17, 2017 at 3:37 pm
           काँग्रेसवाले त्याचा वापर करीत आहेत त्या येड्याला सांगा काँग्रेसच्या नादी नको लागू ...ते स्वतः बुडाले आहेत.. तुलासुद्धा डुबवतील
           Reply
           1. Load More Comments