भारतीय मुलींना तुम्ही हॉलीवूडच्या गाण्यांवर ठेका धरताना पाहिलं असेल, पण हॉलीवूडच्या गाण्यांवर दोन बहिणींना वीणा वाजवताना कधी पाहिलंय का? मग हा व्हिडिओ नक्की पाहा. इंटरनेटच्या महाजालात सध्या अरण्या आणि अथिया या दोघी बहिणींच्या वीणा वादनाच्या व्हिडिओजनी धुमाकूळ घातला आहे.
हॉलीवूडची सुप्रसिद्ध गायिका सिया हिच्या गाण्यावर वीणा वादन केलेला या दोन भारतीय तरुणींचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. या व्हिडिओचा तुफान प्रतिसाद मिळत असून, दोघीही अतिशय खुबीने वीणा वादन करीत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. अरण्या आणि अथिया यांनी अनुक्रमे वयाच्या ५ व्या आणि ७ व्या वर्षापासून वीणा वादनाचे धडे गिरवायला सुरूवात केली होती. त्यानंतर या दोघींनीही कधी मागे वळून पाहिलेच नाही. वीणा वादन क्षेत्रात आपली आईच आपली गुरू असल्याचे या दोघी सांगतात. अरण्या आणि अथियाची आई संगीत शिक्षिका आहेत. आपल्या आईच्या मार्गदर्शनाखालीच या दोघींनीही वीणा वादनाचे प्रशिक्षण घेतले आहे.