तब्बल चार हजार भारतीयांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या भोपाळ दुर्घटनेचे आरोपी आणि युनियन कार्बाईडचे प्रमुख वॉरेन अँडरसन(९३) यांचे निधन झाले आहे.
भोपाळ दुर्घटनेप्रकरणी त्यांना फरार म्हणून घोषित करण्यात आले होते. अँडरसन यांचे २९ सप्टेंबर रोजी निधन झाल्याचे वृत्त न्यूयॉर्क टाईम्सने शुक्रवारी प्रसिद्ध केले आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या कुटुंबियांनी अँडरसन यांच्या निधनाची बातमी जाहीर केली नव्हती. मात्र, सरकारी नोंदीवरून अँडरसन यांचे निधन झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
युनियन कार्बाईड कंपनीच्या प्रकल्पातून विषारी वायूची गळती झाल्याने २ आणि ३ डिसेंबर १९८४ च्या रात्री मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये पाच हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.