कुपवाडा जिल्ह्य़ातील हंडवारा वनक्षेत्रातून सुरक्षा दलाच्या जवानांनी शस्त्रे आणि स्फोटकांचा साठा हस्तगत केला आहे. रविवारी रात्री येथे सुरक्षा दलाची दहशतवाद्यांसमवेत चकमक झडली होती.

केहमल वनक्षेत्रात ६ राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांना संशयास्पद हालचाली दिसल्या. तेव्हा त्यांनी शस्त्र आणि स्फोटकांचा मोठा साठा असलेल्या दहशतवाद्यांना आव्हान दिले. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला त्याला सुरक्षा दलाने जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दहशतवादी पसार झाले. त्यानंतर हाती घेण्यात आलेल्या शोधमोहिमेच्या वेळी पिस्तूल, दोन मॅगझिन्स, ४० जिवंत काडतुसे, एक दुर्बीण, कुऱ्हाड आदी शस्त्रे सापडली.

3334 children underwent heart surgery under the National Child Health Programme
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी…
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद

चार रायफलींसह पसार झालेला कॉन्स्टेबल हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये

काश्मीरच्या बडगाम जिल्ह्य़ातील पोलीस ठाण्यावरून चार रायफलींसह पसार झालेला पोलीस कॉन्स्टेबल हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याचे वृत्त हाती आले आहे. या कॉन्स्टेबलचे नाव सैद नवीद मुश्ताक असे असून तो एफसीआयच्या गोदामातून चार रायफली घेऊन पसार झाला होता. मुश्ताक दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याचे गुप्तचर यंत्रणांनी सांगितले. जम्मू-काश्मीर पोलीस रायफलींसह पसार होऊन दहशतवादी संघटनेत सहभागी होत असल्याचे अनेक प्रकार घडले आहेत.