पश्चिम बंगाल विधानसभेच्या तिसऱया टप्प्याच्या मतदानादरम्यान विविध ठिकाणी झालेल्या हिंसाराच्या घटनांमध्ये चार जण जखमी, तर एकाचा मृत्यू झाला. प.बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या तिसऱया टप्प्यात एकूण १६ जागांसाठी मतदानाला गुरूवारी सकाळपासून सुरूवात झाली. यातील केटूग्राम विधानसभा क्षेत्रातील बुथ क्रमांक ७८ येथे झालेल्या हाणामारीत सीपीआय(एम) पक्षाचा कार्यकर्ताच्या कानाला दुखापत झाली, तर आणखी एका कार्यकर्त्याचा पाय तुटला. दोघांनाही प्राथमिक उपाचार केंद्रात दाखल करण्यात आले. याप्रकरणी चार जणांना ताब्यात देखील घेण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी सौमित्र मोहन यांनी दिली.
दुसरीकडे, मुर्शिदाबादमध्ये बुथ क्रमांक ४८ येथे क्रूड बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. यात एका ३५ वर्षीय सीपीआय(एम) कार्यकर्त्याचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हा स्फोट घडवून आणल्याचा आरोपी सीपीआय(एम) कार्यकर्त्यांनी केला आहे.