भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या प्रमुख कार्यांपैकी एक कार्य म्हणजे देशातील चलन व्यवस्था सुरळीत ठेवणे हे आहे. यामध्ये देशात नवे चलन आणणे, त्याचे वाटप करणे, जुन्या नोटांची विल्हेवाट लावणे आणि सर्व बॅंकांमध्ये जमा झालेली नगदी आपल्याकडे ठेवणे यांचा समावेश आहे.

ही सर्व कामे पार पाडण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेकडे देशभरात अनेक खजिने आहेत ज्यांना करन्सी चेस्ट असे म्हणतात. असे करन्सी चेस्ट किंवा खजिने देशभरात एक दोन नव्हे तर कित्येक असतात त्यामुळे चलन वाटपाचे काम अत्यंत सुलभ होते.

fssai to examine mdh and everest spices banned recently in singapore and hong kong
मसाल्यावरील बंदीच्या  सिंगापूर, हाँगकाँगच्या निर्णयाची तपासणी; एफएसएसएआय, मसाला मंडळाचे पाऊल
WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
NPCIL Recruitment 2024
NPCIL Recruitment 2024: ट्रेड अप्रेंटिसच्या ३३५ जागांसाठी निघाली भरती, शेवटच्या तारखेपूर्वी करा अर्ज

देशभरातील अर्थव्यवस्थेत चलनाचा संचार योग्य रितीने व्हावा यासाठी रिझर्व्ह बॅंकेकडे सुमारे ४२११ करन्सी चेस्ट आहेत. या व्यतिरिक्त आरबीआयकडे ३९९० डेपो आहेत. ज्या भागात हे चेस्ट असतात त्या भागातील बॅंका आपला पैसा येथेच जमा करतात. म्हणजेच वितरणाव्यतिरिक्त बॅंकांच्या पैशांचे सेफ डिपॉझिट म्हणूनही हे चेस्ट काम करतात.

नोटबंदीनंतर तर या चेस्टचे काम अनेक पटींनी वाढले आहे. सरकारी प्रेसमध्ये छापण्यात आलेल्या नव्या नोटा चेस्टमध्ये येतात आणि तेथून त्या वाटण्यासाठी बॅंकामध्ये पाठवल्या जातात.
करंसी चेस्टची प्रमुख कार्ये

१. जनतेची चलनाची गरज भागवणे

२. अयोग्य नोटा चलनातून बाद करणे

३. चलन बदलवून देणे

४. सरकारची बिले चुकती करण्यास मदत करणे

५. खराब नोटा बदलून देणे

६. सुरक्षेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून नगदी पैशाचे जास्त स्थलांतरण होणार नाही याकडे देखील करंसी चेस्ट ला लक्ष द्यावे लागते.
ज्या प्रमाणे नोटांचे वाटप होते अगदी त्याच प्रमाणे नाण्यांचेही वाटप होते.

करन्सी चेस्टचे सर्वात महत्त्वाची भागीदार आहे स्टेट बॅंक ऑफ इंडिया. या व्यतिरिक्त सर्व राष्ट्रीयकृत बॅंका, खासगी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बॅंका, १ विदेशी बॅंक आणि १ सहकारी तसेच १ ग्रामीण बॅंकदेखील आरबीआयला मदत करते. देशभरातील चार प्रेसमध्ये छापल्या गेलेल्या नोटा आरबीआयच्या १८ इश्यू ऑफिसमध्ये जातात तेथून त्या नोटा चेस्टमध्ये जातात. हे काम करण्याची पद्धत अतिशय गुप्त असते. रेल्वे, एअर फोर्सचे मालवाहक विमान आणि राज्यातील पोलिसांच्या मदतीने हा पैसा चेस्टमध्ये येतो आणि तेथून बॅंकात जातो. अतिशय संवेदनशील भागात लष्कराची मदत घेतली जाते. या प्रकारे प्रेसमध्ये छापलेला पैसा ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचे वचन आरबीआय पूर्ण करते.