उरी ह्ल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने बुधवारी रात्री सीमारेषा पार करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला चढवला. दरम्यान, या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भारताचे डीजीएमओ रणबीर सिंह यांनी परराष्ट्र मंत्रालय आणि लष्कराच्या नवी दिल्ली येथील संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तसंच भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज असल्याचेही सिंग यांनी म्हटले आहे.

सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?
‘सर्जिकल स्ट्राईक’ म्हणजे अतिशय ठरवून आणि नेमकेपणाने केलेली लष्करी कारवाई होय. या कारवाईमध्ये जे टार्गेट असतं त्यांच्यावरच थेट हल्ला केला जातो. आजूबाजूच्या कोणालाही या हल्ल्यामुळे नुकसान पोहचणार नाही याची काळजी यामध्ये घेतली जाते. भारतीय लष्कराने बुधवारी रात्री पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण तळांना लक्ष्य करत त्यावर हल्ले चढवले.

Man wraps utensils in plastic to avoid washing them.
भांडी घासावी लागू नये व्यक्तीने शोधला भन्नाट जुगाड! हर्ष गोयंकांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
loksatta kutuhal artificial intelligence introduction of computer vision
कुतूहल : संगणकीय दृष्टी म्हणजे काय?
Health Benefits Of Using Rock In Food, Adding Hot Rock In Tadka Dal
Video: आमटीत गरम दगडाची फोडणी देणं किती फायद्याचं? फोडणीत काय वापरावं, वेळ व खर्चाचं सूत्र पाहा

‘सर्जिकल स्ट्राईक’मध्ये कायद्याअंतर्गत बसणा-या गोष्टींचा विचार करूनच शत्रूच्या तळावर हल्ला केला जातो. यामध्ये अप्रत्यक्षरिसुध्दा कोणतीही वाहने, इमारती अथवा सार्वजनिक पायाभूत सुविधांची किंवा उपयुक्त गोष्टींची हानी होणार नाही याचीही खबरदारी घेतली जाते. ठरलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊन विमानातून बॉम्बहल्ला करणे हे ‘सर्जिकल स्ट्राईक’चे योग्य उदाहरण म्हणता येईल. जमिनीवरून बॉम्बहल्ला करण्याच्या हे अगदी विरूध्द आहे. अमेरीकन सैन्याने २००३ मधील इराक युध्दाच्या सुरूवातीच्या काळात बगदादवर केलेला हल्ला हा ‘सर्जिकल स्ट्राईक’चे उदाहरण आहे. यावेळी सरकारी आणि लष्करी इमारतींवर अमेरीकन हवाईदलाच्या विमानांमधून बॉम्बहल्ले करण्यात आले होते.

भारतीय लष्कराच्या म्हणण्यानुसार यापूर्वीही ‘सर्जिकल स्ट्राईक’चा वापर करण्यात आला होता. परंतु, त्याची उघडपणे वाच्यता करण्यात आलेली नव्हती. यावेळी पहिल्यांदाच भारतीय लष्कराने केलेली कारवाई प्रसारमाध्यमांसमोर उघड करण्यात आली आहे.