पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी दुसऱ्यांदा एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देणार आहेत. नेटवर्क १८ चे समूह संपादक राहुल जोशी हे मोदींची मुलाखत घेणार असून, त्यामध्ये विचारण्यात आलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांना मोदी उत्तर देतील. नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी टाइम्स नाऊला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी टाइम्स नाऊचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी विचारलेल्या प्रश्नांना मोदींनी उत्तरे दिली होती. या मुलाखतीवर नंतर सोशल मीडियावर समिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रीया उमटल्या होत्या. काहींनी या मुलाखतीचे कौतुक केले होते. तर काहींनी मोदींना अवघड प्रश्न न विचारल्याबद्दल टीकाही केली होती. दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देत आहेत. त्यामुळे या मुलाखतीत ते काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष असेल.
मोदी यांच्या या दुसऱ्या मुलाखतीचे प्रोमो सध्या नेटवर्क १८ च्या विविध वाहिन्यांवर दाखविण्यात येत आहेत. त्यामध्ये मोदी यांनी देशापुढील विविध प्रश्नांवर भाष्य केल्याचे प्रोमोंमधून बघायला मिळते. स्वतः मोदींनी या मुलाखतीसंदर्भात ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली असून, वेगवेगळ्या विषयांवर बोलल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने, जीएसटी, उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणूक, दलितांवर होणारे हल्ले आदी विविध विषयांवर या मुलाखतीमध्ये मोदी यांनी भाष्य केले असल्याचे समजते.

नरेंद्र मोदी यांची मुलाखत कधी दिसणार?

राहुल जोशी यांनी घेतलेली नरेंद्र मोदी यांची मुलाखत शुक्रवारी, २ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. या मुलाखतीमध्ये मोदी यांना विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली आहेत.

नरेंद्र मोदी यांची मुलाखत किती वाजता सुरू होणार?

नरेंद्र मोदी यांची मुलाखत रात्री नऊ वाजता सुरू होईल.

कोणत्या वाहिनीवर नरेंद्र मोदी यांची मुलाखत पाहता येईल?

सीएनएन-न्यूज १८ वाहिनीवर ही मुलाखत पाहता येईल.

या मुलाखतीचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येईल?

https://www.youtube.com/user/ibnlive या ठिकाणी तुम्हाला नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीचे लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येईल.

मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदी यांनी कोणत्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे?

भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने, जीएसटी, उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणूक, दलितांवर होणारे हल्ले, माध्यमांची भूमिका आदी विविध विषयांवर या मुलाखतीमध्ये मोदी यांनी भाष्य केले असल्याचे समजते.