मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- पाणी प्रश्नावरून नगरसेवक व नागरिकांनी 'ओसीडब्ल्यू'च्या कार्यालयातील साहित्य जाळले
- शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडणार
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
कॉंग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला कमी लेखण्याचा प्रयत्न झाल्यास आगामी २०१४ ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा इशारा, केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. केरळमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात पवारांनी हे वक्तव्य केलं.
या मेळाव्यात शरद पवारांनी कॉंग्रेसवर कडाडून टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुक स्वबळावर लढण्याचे ठरविले असतानाही कॉंगेरसने नऊ ठिकाणी आमच्याच विरोधात आपले उमेदवार उभे केले. त्यापैकी पाच ठिकाणी आमच्या आणि काँग्रेसच्या उमेदवारामध्ये थेट लढाई होती, तर चार ठिकाणी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार उभे होते. सहाजिकच याचा फायदा भाजपला झाला आणि भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा गुजरातमध्ये सत्ता मिळविण्यास मदत झाली. कॉंग्रेसमुळेच गुजरातमध्ये भाजपचा विजय झाला, असा आरोप पवारांनी केला. कॉंगेरसचे हे दुटप्पी धोरम असेच चालू राहिल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसला आगामी २०१४ च्या निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत विचार करावा लागेल, असा इशारा पवारांनी दिला आहे.
यूपीए सरकार विरोधात जनतेक्षा प्रक्षोभ वाढत असताना घटक पक्षांनीही कॉंग्रेसच्या विरोधात बंडाचे निशाष उगारले आहे. राज्यापाठोपाठ आता केंद्रातही राष्ट्रवादीने बंडाचे धोरण पुकारल्यामुळे संख्याबळासाठी जोड-तोडीचे राजकारण करू पाहणा-या कॉंग्रेस पक्षाला लवकरच पवारांच्या या विधानाचा विचार करून ठोस पावले उचलावी लागतील असं चित्र सध्या दिसत आहे.




















पवारांनी आता तरी आपल्या मर्यादा ओळखाव्यात. खरोखर जर राष्ट्रवादीची एवढी ताकद असेल तर प्रथमतः महाराष्ट्रामध्ये स्वबळावर सत्तेवर येवून दाखवावे. राष्ट्रवादी हा प्रादेशिक पक्ष आहे हे सत्य आता तरी पवारांनी स्वीकारावयास हरकत नसावी…..
वा,वा पवार महाशय, आता दिल्ली घटनेच्या वाहत्या गंगेत तुम्हीही हात धुवून घेताय! तुमचे संधिसाधू राजकारण साऱ्या महाराष्ट्राला चांगले माहिती आहे.
एवढा जर तुम्हाला स्वाभिमान आहे तर तुम्ही केंद्र सरकारमधून राजीनामा का बरं देत नाही तसेच राज्यात आपली काँग्रेसबरोबरची भागीदारी का बरं तोडत नाही? एरवी सिंचन घोटाळ्यात, श्वेतपत्रिका काढण्याच्या वेळी मारे काँग्रेसबरोबर गुलुगुलु करत होतात आणि आता दिल्लीत काँग्रेस अडचणीत आल्याबरोबर तुमचे black -mailing चे उद्योग सुरु झाले वाटतं!
मराठी जनतेला माहित आहे की कॉंग्रेस पक्षाकडून (महा)राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला कमी लेखण्याचा प्रयत्न आतापर्यंत अनेक वेळा झालेला आहे. तरीपण कोडगेपणाचा कळस व राज्यसत्ता अभिलाशा मुळे परदेशी बाईच्या पदराची छाया सोडवत नाही. या कारणास्तव आगामी २०१४ ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. केरळ मेळाव्यात शरद पवारांनी कॉंग्रेसवर कडाडून टीका केली हा सरत्या २०१२ वर्षातील मोठा विनोद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुक स्वबळावर लढण्याचे ठरविले म्हणुन कॉंगेरसने नऊ ठिकाणी त्यांच्या विरोधात आपले उमेदवार उभे केले त्यात दोन्ही काँग्रेसचा दारूण पराभव झाला हे ताजे ज्वलंत उदाहरण आहे.तुझे माझे जमेना तुझ्या वाचून सत्ता मिळेना! लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा इचार ईसरा राव!