राजपथ येथून पंतप्रधानांचा ताफा जाण्याच्या बेतात असतानाच वीस वर्षीय युवतीने फुलदाणी फेकल्यामुळे बुधवारी सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडाली. तिला ताब्यात घेण्यात आले आहे.
नीना रावळ असे या तरुणीचे नाव असून ती उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. मोदी यांचा ताफा साऊथ ब्लॉकमधून निघण्याच्या बेतात असताना मिनिटभर अगोदर झालेल्या फुलदाणी फेकण्याच्या प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी समोर आल्या आहेत. साऊथ ब्लॉकमधून पंतप्रधान निघाल्याची वर्दी मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी विजय चौकातील नागरिकांना पदपथावर जाण्याचे आदेश दिले. त्यामुळे चिडलेल्या या तरुणीने रायसीना हिलकडे धाव घेत रस्त्यावर फुलदाणी फेकली.