घटस्फोटानंतर परपुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवणाऱया महिलेला पतीकडून पोटगी मागण्याचा अधिकार नाही, असा निकाल मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. ज्याप्रमाणे घटस्फोटानंतर पत्नीला पोटगीची रक्कम देण्याचे पतीवर बंधन आहे. त्याचप्रमाणे घटस्फोटानंतर परपुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवल्यावर आधीच्या पतीकडे पोटगी न मागण्याचे महिलेवरही बंधन आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
तमिळनाडूतील एका सरकारी कर्मचाऱयाने घटस्फोटीत पत्नीला प्रतिमहिना एक हजार रुपये पोटगी देण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. संबंधित पत्नीचे परपुरुषासोबत शारीरिक संबंध असल्याच्या आरोपावरून त्याने २०११ मध्येच पत्नीला घटस्फोट दिला होता. त्यावरील सुनावणीनंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नागमुथू यांनी हा निकाल दिला.
घटस्फोटानंतर पत्नीचे परपुरुषासोबत शारीरिक संबंध असतील, तर तिला पतीकडून पोटगी मागता येणार नाही. त्यासाठी ती अपात्र ठरेल. ज्याच्या सोबत तिचे शारीरिक संबंध आहेत. त्याच्याकडूनच ती खर्चासाठी पैशांची मागणी करू शकेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.