मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- पाणी प्रश्नावरून नगरसेवक व नागरिकांनी 'ओसीडब्ल्यू'च्या कार्यालयातील साहित्य जाळले
- शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडणार
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
उत्तर प्रदेशच्या तीन तरूणांनी एका ४२ वर्षीय महिलेला बेशुध्द करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर तिला दक्षिण-पूर्व दिल्लीमध्ये फेकून देण्यात आले.
दक्षिण दिल्लीमध्ये १६ डिसेंबर रोजी धावत्या बसमध्ये एका २३ वर्षीय तरूणीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सदर महिला जयपूरची राहणारी असून वृन्दावन परिसरामध्ये बलात्कार केल्यानंतर दक्षिण-पूर्व दिल्लीच्या कालकाजी भागात तिला फेकून देण्यात आले.
ही घटना रात्री जवळपास सव्वा नऊ वाजता घडली. त्यानंतर तेथून जाणा-या एका प्रवाशाने सदर महिलेला पाहिल्यानंतर त्याने पोलिस ठाण्यात फोन केला. पीड़िता महिला २२ डिसेंबरला वृन्दावन येथे गेली होती आणि काल (बुधवार) तेथून घरी परतत असताना ही घटना घडली.
संबंधित महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसविले व एका फ्लॅटमध्ये तिला नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्या फ्लॅटवर त्यापूर्वीच दोन लोक तेथे उपस्थित होते. तेथे या तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्या महिलेला कालकाजी भागात गाडीतून फेकून दिले.




















हे इतके सरळ वाटत नाही. महाराष्ट्रात सहसा कुठलीही सुजाण स्त्री अनोळखी पुरुषांकडून रात्री लिफ्ट घेणार नाही. याचा अर्थ एकतर ती त्या लिफ्ट देणा-या लोकांना ओळखत होती किंवा इतर काहीदेखील असू शकेल. शिवाय हल्लीच्या जगात विशेषत: युपी, दिल्ली भागात आणीबाणी नसेल तर त्या बाईला रात्रीच परत येण्याची तितकी आवश्यकता होती काय? मी बलात्का-यांची बाजू अजिबात घेत नाहीये, त्यांना सर्वात कडक शिक्षा व्हावी, पण हे लिफ्ट प्रकरणदेखील तितके सरळ वाटत नाही.