पश्चिम आफ्रिकेत वेगाने पसरणारी इबोलाची साथ आटोक्यात आणण्याच्या लढय़ाला भक्कम मदतीचा हात जागतिक बँकेने पुढे केला आहे. यासाठी १० कोटी ५० लाखांची मदत बुधवारी जाहीर केली.
पश्चिम आफ्रिकेतील लायबेरिया, सिएरा लिओन आणि गिनिआ या देशांत इबोलाच्या साथीने आजवर २ हजार ४०० जणांचा बळी घेतला आहे. प्राणघातक इबोला विषाणूची पुढील वाटचाल रोखण्यासाठी ऑगस्ट महिन्यातच जागतिक बँकेने सुमारे २० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली.
जागतिक स्तरावर इबोलाविरोधात अधिक प्रयत्नांची गरज आहे. खासकरून पश्चिम आफ्रिकेत अवस्था अत्यंत दयनीय आहे. त्यामुळे जगाची शक्ती एकवटली गेली पाहिजे, अशी अपेक्षा जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम योन्ग किम यांनी निवेदनात म्हटले आहे. इबोलाविरोधात हाती घेतलेल्या मोहिमांवर निधीचा सकारात्मक परिणाम होईल, असे किम म्हणाले.