हास्य हे प्रभावी औषध आहे, ज्याच्या आयुष्यात हास्य आहे तो असतो आनंदी, उत्साही आणि प्रेमळही! म्हणूनच रोजच्या जगण्यातल्या ताण-तणावांवर मात करण्यासाठी हास्याचं टॉनिक घ्यायलाच हवं.  आज ३ मे जागतिक हास्य दिन.  हास्य ही मानवाला लाभलेली अप्रतिम देणगी आहे. ज्याला मनमोकळे, खळखळून हसता येते तो माणूस सुदैवी आहे. हसणार्‍या चेहर्‍याभोवती मित्रमैत्रिणींची गर्दी होते. एक वेगळाच प्रभाव समोरील व्यक्तीवर पडत असतो. शिवाय हसतमुख चेहर्‍याच्या व्यक्ती अनेक कठीण प्रसंगांवरही सहज मात करतात. हास्य हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. हा घटक आपण जेवढा विकसित केला तेवढे आपले जीवन सुखी आणि आनंदी होत असते.
हास्य ही मूलत: जागतिक भाषा आहे. जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात तुम्ही गेला तरी या भाषेने तुम्ही इतरांसोबत संवाद साधू शकता. जगातील सर्व माणसे आनंदाची स्थिती व्यक्त करण्यासाठी याच भाषेचा वापर करतात. स्मित हास्य, खळखळून हसणं, पहाडी हास्य असे हास्यांचे विविध प्रकार असले तरी आनंद हाच त्यामागील भाव असतो. कुत्सित हास्य तेवढे प्रकर्षाने टाळावे. जगातील कोणत्याही दोन हसणार्‍या व्यक्तींमध्ये सहज मैत्री होऊ शकते. मग त्या व्यक्ती कोणत्याही देशाच्या, भाषेच्या, जातीच्या, धर्माच्या असोत. कारण, हास्य हा सर्वांचा समान धर्म आहे. हास्य हे जगातील सर्वांशी मैत्री करून देणारे प्रभावी आनंदास्त्र आहे.

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण