भारतीय घटनेने प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे अल्पसंख्य समाजाविरुद्ध कोणत्याही स्वरूपातील दुजाभाव अथवा हिंसाचार सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिला. संघ परिवारातील काही नेत्यांकडून अल्पसंख्य समाजाबाबत होत असलेल्या शेरेबाजीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारची शेरेबाजी अनावश्यक होती, असे मत व्यक्त करून मोदी यांनी संघ परिवाराला समज दिल्याचे मानले जात आहे. यामुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे.
देशातील कोणत्याही समाजाविरुद्ध दुजाभाव अथवा हिंसाचार सहन करणार नाही. त्यांना लक्ष्य करणे योग्य नाही. घटनेने प्रत्येकाला कोणत्याही धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे, असेही मोदी एका मुलाखतीत म्हणाले.
आमचे विरोधक सरकारने केलेल्या कामांना कमी लेखण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशा शब्दांत मोदी विरोधकांवर बरसले आहेत. गेली ६० वर्षे ज्यांनी देशाला लुबाडले त्यांच्यासाठी बुरे दिन आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.