२०१४ साली भारतामध्ये गुगलच्या सर्च इंजिनवर सर्वाधिक काय शोधले गेले, याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या अहवालावर नजर टाकल्यास, दोन मोठ्या गोष्टी निदर्शनास आल्या आहेत. एक म्हणजे सर्च इंजिनवर भारतीय व्यक्ती एखादी गोष्ट थेटपणे शोधत नसून, अजुनही युआरएल(URL) लिंकच्याच आधारे आपल्याला हवे ते जाणून घेण्याला भारतीय लोकांची पसंती आहे. गेल्या काही महिन्यांतील वातावरण पाहता, नरेंद्र मोदी हेच देशात सर्वाधिक लोकप्रिय असल्याच्या समजुतीलाही या अहवालाने छेद दिला आहे. यंदा गुगलवर सर्वाधिक वेळा शोधण्यात आलेल्या भारतीयांच्या यादीत अभिनेत्री सनी लिओनीने बाजी मारली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. रागिनी एमएमएस-२ या चित्रपटाच्या न भारतीयांनी गुगलवर  मोदींच्या पाठोपाठ सलमान खान, कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण यांनी अनुक्रमे तिसरे, चौथे आणि पाचवे स्थान मिळवले आहे. त्यामुळे मोदी वगळता पहिल्या पाच जणांमध्ये बॉलिवूडचा प्रभाव असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र, भारतीय राजकारण्यांमध्ये मोदींनी आपले अग्रस्थान कायम राखले आहे.
याशिवाय, यंदाच्या वर्षातील सर्वाधिक वेळा शोधण्यात आलेल्या वेबसाईटस, माहिती, लोकांना उत्सुकता असलेले विषय यांचीही वर्गवारी केलेली यादी गुगलकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सर्वाधिक शोधण्यात आलेले इव्हेंटस

सर्वाधिक शोधण्यात आलेल्या वेबसाईटस