इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेत सामील होण्याच्या हेतूने निघालेल्या ११ भारतीय नागरिकांना संयुक्त अरब अमिराती सरकारने(यूएई) अटक केल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.
यूएईच्या गुप्तचर विभागाचे अधिकारी गेल्या काही महिन्यांपासून भारतीय नागरिकांच्या दोन गटांवर लक्ष ठेवून होते. या दोन्ही गटांचे वास्तव्य अबुधाबी आणि दुबईत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे गट ‘इसिस’च्या समर्थनार्थ माहिती प्रसारित करीत असल्याचे आढळून आले. या गटांमध्ये पाकिस्तान व बांगलादेशातील नागरिकांचाही समावेश आहे. ‘इसिस’ला आर्थिक तसेच इतर सहाय्य करण्याच्या गुन्ह्याखाली त्यांना अटक करण्यात आली आहे, असे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.