भारतात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या वाढत आह़े  गेल्या वर्षी ही संख्या ४० दशलक्षपर्यंत पोहोचली होती आणि विशेष म्हणजे त्यापैकी ५० टक्के वापरकर्ते २५ पेक्षा कमी वयाचे आहेत, असे नेल्सन या संशोधन संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आह़े
तरुणांमध्ये सोशल नेटवर्किंग साइट्सना झटकन भेट देण्याचे आकर्षण हे स्मार्टफोनकडे तरुणांना ओढण्यामागचे प्रमुख कारण आह़े  स्मार्टफोन हे उपकरण आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या इंटरनेट आदीचे दर दिवसागणिक घटत असल्याने, तसेच स्मार्टच्या वापराची उपयुक्तता मात्र अनेक पटींनी वाढत असल्याने ग्राहक आपल्या पारंपरिक मोबाइल उपकरणाकडून स्मार्टफोनकडे वळत आहेत, असाही सर्वेक्षणाचा निष्कर्ष आह़े
 सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१२ या कालावधीत देशातील ४६ शहरांमध्ये भारतीय स्मार्ट फोन वापरकर्त्यांचा अभ्यास करण्यात आला़  त्यात लोक अ‍ॅण्ड्रॉइड कार्यप्रणाली असणाऱ्या मोबाइलला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचे दिसून आल़े  त्याचबरोबर सिमबायन फोनचे वापरकर्तेही भारतात मोठय़ा प्रमाणात आहेत़  विंडोज फोन, ब्लॅक बेरी आणि आयओएस उपकरणांना मात्र भारतीय बाजारात केवळ एक आकडी समभाग आहेत़  टॅब्लेटकडे भारतीयांचा वाढता कल आह़े  सर्वेक्षणादरम्यान ३ टक्के लोक टॅब्लेट वापरकर्ते होत़े, तर इतर ११ टक्के लोकांना टॅब्लेट खरेदी करण्याची इच्छा होती़
त्यापैकी स्मार्टफोनचा फोन कॉल आणि संदेश वहनासाठी २५ टक्के वापर करण्यात येतो़  बाकीचा सर्वाधिक उपयोग खेळ, अ‍ॅप्स आणि इंटरनेटसाठीच होत असल्याचे दिसून आल़े  पेड अ‍ॅप्सपैकी ५८ टक्के मागणी खेळांसाठी आणि त्या खालोखाल ५३ टक्के तात्काळ संदेश आणि ४५ टक्के मागणी गाण्यांसाठी आह़े
घातक अँड्रॉइड अ‍ॅपपासून सावधान
संगणक व इंटरनेट सुरक्षा संस्थांनी स्मार्टफोन वापरकर्त्यांना एका घातक अँड्रॉइड अ‍ॅप्लिकेशनबाबत धोक्याचा इशारा दिला असून, हे अ‍ॅप्लिकेशन तुमच्या स्मार्टफोनमध्ये घुसल्यानंतर त्याची सुरक्षा नष्ट करते व तुमच्या स्मार्टफोनवरून अज्ञात व्यक्तींना एसएमएस पाठवले जातात. हे मालवेअर अ‍ॅप्लिकेशन असून त्याचे नाव सुपरक्लीन किंवा ड्रॉइडक्लीनर असे आहे. कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडिया ही भारतातील एक प्रमुख संगणक सुरक्षा संस्था आहे. त्यांनी या धोकादायक अ‍ॅप्लिकेशनबाबत इशारा दिला आहे. व्यक्तिगत संगणक व स्मार्टफोनना बाधित करणारे हे मालवेअर अ‍ॅप्लिकेशन अँड्राइड मार्केटमध्ये उपलब्ध आहे. यूएसबी लावलेल्या संगणकात त्यामुळे बिघाड होऊ शकतो. अँड्रॉइड तंत्रज्ञानावर आधारित स्मार्टफोननाही त्यामुळे धोका आहे.