अफगाणिस्तानातील हिंदुकोश पर्वतीय भागात सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास भूकंपाचा तीव्र धक्का बसला. या भूकंपाचे धक्के जम्मू-काश्मीर, श्रीनगर आणि दिल्लीसह उत्तर भारतात देखील जाणवले. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानातील फयाजबाद येथून ८८ किमी अंतरावर असून भूकंपाची तीव्रता ६.२ रिश्टर स्केल असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. पाकिस्तानात देखील या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचीही माहिती समोर आली आहे. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारच्या जिवीत अथवा वित्तहानीची माहिती अद्याप कळू शकलेली नाही.