दिल्ली सरकारमधील मंत्री असीम अहमद खान यांची लाच घेण्याच्या आरोपावरून हकालपट्टी करून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रस्थापित राजकीय पक्षांना मोठा धक्का दिला आहे. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून जन्मलेल्या आम आदमी पक्षाच्या स्थापनेसाठी आर्थिक मदत करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाकडूनच असीम अहमद खान यांनी लाच मागितली. हे प्रकरण केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचल्यावर त्यांनीच नसीम खान यांच्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली व संबंधित बांधकाम व्यावसायिकामार्फत संभाषणाचे रेकॉर्डिग केले. या बांधकाम व्यावसायिकानेच केजरीवाल यांच्याकडे रेकॉर्डिग सुपूर्द केल्याचा दावा पक्षसूत्रांनी केला. असीम खान यांच्या जागी इमरान हुसैन यांना केजरीवाल यांनी अन्न व पुरवठा मंत्रालयाची धुरा दिली आहे.