आम आदमी पक्षाच्या आमदार अलका लांबा यांच्यावर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. या दगडफेकीत लांबा यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. उत्तर दिल्लीतील काश्मीरी गेट परिसरात ही घटना घडली.
दिल्ली येथील आयएसबीटीजवळ हनुमान मंदिर परिसरात अलका लांबा त्यांच्या कार्यकर्त्यांसह अंमलीपदार्थविरोधी मोहीमेसाठी आल्या होत्या. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. यात त्याच्या डोक्याला जखम झाली आहे. त्यांना उपचारासाठी अरुणा असफ अली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, दगडफेक करणा-या माणासाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.