ब्रिटनचे पंतप्रधान डेविड कॅमरून मंगळवारी भारत दौ-यावर येत आहेत. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदीतील घोटाळा उघडकीस आल्यानंतर  काही दिवसांतच भारताच्या दौ-यावर येणारे ब्रिटनचे पंतप्रधान डेविड कॅमरून यांची मंगळवारी भारतीय नेतृत्वासोबत होणा-या बैठकीत या प्रकरणासंदर्भात  अधिक माहिती देण्याबाबत दबाव तयार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॅमरून यांचा दौरा अशा वेळी होत आहे जेव्हा सरकारने इटलीची कंपनी ऑगस्टावेस्टलॅंड कडून १२ हेलिकॉप्टर खरीदीचा करार रद्द करण्याची कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई ऑगस्टावेस्टलॅंड ची मुख्य कंपनी फिनमेकानिका चे सीईओ ग्यूसेप ओर्सी यांच्यासोबत करार होण्यासाठी भारतीय मध्यस्थांना लाच देण्याच्या आरोपात मिलानमध्ये अटक करण्यात आल्यानंतर सुरू झाली आहे.
या हेलिकॉप्टरची निर्मिती दक्षिण-पश्चिम इंग्लंड मध्ये झाली आहे आणि भारताला या व्यवहारात तीन हेलिकॉप्टर्स ताब्यात मिळाली आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अधिकारी प्रवक्त्याने सांगितले कि, भारताने सुरूवातीपासूनच या प्रकरणाच्या माहितीसाठी आणि सहयोगासाठी ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिका-यांना राजकीय पातळीवर सूचना दिल्य़ा आहेत.
प्रवक्त्याने सांगितले कि, ब्रिटनकडून या प्रकरणात अंतर्गत प्रतिक्रिया मिळाली आहे. ते पुढे म्हणाले, ‘‘अंतर्गत प्रतिक्रियेमुळे कुणाचेही समाधान होत नाही. प्रत्येकीला पूर्ण प्रतिक्रियेची आवश्यकता असते. त्यामुळे आम्हाला पूर्ण प्रतिक्रियेची अपेक्षा आहे.