अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी घेण्यात येणाऱया हेलिकॉप्टर प्रकरणात घोटाळा उघडकीस आल्यानंतर भारताने ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीशी झालेला करार रद्द केला. त्यानंतर या प्रकल्पासाठी दिलेली १७०० कोटी रुपयांच्या बँक तारण रक्कम प्राप्त करण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका इटलीच्या न्यायालयाकडून आज(मंगळवार) फेटाळून लावण्यात आली आहे.
हेलिकॉप्टर प्रकरणात घोटाळा उघडकीस आल्याने ऑगस्टा वेस्टलँड या अँग्लो इंडियन कंपनीबरोबर तब्बल ३,५४६ कोटी रुपयांचा व्यवहार रद्द करण्यात आला होता. त्यानंतर या करारातील तारण रक्कम भारत गमावणार नसल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार तारण रक्कम प्राप्त करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले व इटलीच्या न्यायालयात त्याबद्दलची याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु, न्यायालयाने याचिका रद्दबातल ठरविल्याची माहिती समोर आली आहे.