ह्य़ूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस म्हणजे एड्स विषाणूशी संबंधित असलेले लेंटिव्हायरसेस (सतत रचना बदलणारे विषाणू) हे आफ्रिकेतील नर वानरांमध्ये १.६० कोटी वर्षांपासून अस्तित्वात होते असे नवीन अभ्यासात निष्पन्न झाले आहे.
अमेरिकेतील बोस्टन महाविद्यालयाचे वेलकिन जॉन्सन व त्यांच्या सहकाऱ्यांनी अंतर्गत रचना सतत बदलणाऱ्या लेंटिव्हायरसेस (रेट्रोव्हायरसेसचा एक प्रकार) या विषाणूंचा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. नर वानरांमध्ये हे विषाणू अस्तित्वात होते. विशेष म्हणजे ट्रिम ५ हे जनुक या विषाणूच्या विरोधात काम करीत असते व ते या विषाणूंपासून पेशींचे रक्षण करीत असते.
ट्रिम ५ जनुक लेंटीव्हायरस या विषाणूच्या पृष्ठभागावर असलेल्या कणांच्या सान्निध्यात येते व त्या विषाणूंची संख्या वाढण्यास प्रतिबंध करते. ट्रिम ५ या जनुकाची आवृत्ती वानरांमध्ये असते तशी ती माणसांमध्येही असते, पण अनेक वानरांमध्ये हे जनुक एचआयव्ही विषाणूंना निरुपद्रवी करून टाकते. रेट्रोव्हायरसेस म्हणजे रचना सतत बदलणाऱ्या एचआयव्ही विषाणूंना रोखण्यासाठी ट्रिम ५ या जनुकात कालांतराने आफ्रिकी वानरांमध्ये सतत बदल होत गेले. ट्रिम ५ या जनुकाच्या उत्क्रांतीचे टप्पे उलगडण्यात आले असून त्यासाठी आफ्रिकेतील २२ वानर प्रजातींची डीएनए क्रमवारी उलगडण्यात आली आहे. आताचे जे सिमियन इम्यनोडेफिशियन्सी व्हायरस म्हणजे एसआयएम विषाणू आहेत. त्यांच्याची संबंध असलेले विषाणू आफ्रिकेतील वानरांमध्ये १.१ ते १.६ कोटी वर्षांपासून अस्तित्वात होते. वैज्ञानिकांनी तेव्हाचे ट्रिम ५ व आताचे ट्रिम ५ या जनुकाचे एकूण १९ प्रकार शोधून काढले आहेत व ते पेशींमध्ये प्रस्थापित करून कुठला ट्रिम जनुक कुठल्या विषाणूला प्रतिकार करतो याचाही अभ्यास केला आहे. मॅकॉक, मँगबेज व बबून या माकडांच्या प्रजातींमध्ये लेंटिव्हायरसेसना ट्रिम ५ जनुके प्रतिकार करतात पण इतर प्रकारच्या रेट्रोव्हायरसेसमध्ये हे जनुक फार प्रतिकार करू शकत नाही. सेरकोपिथेसिनाय हा आफ्रिकी वानरांचा उपप्रकार आहे. त्यात एड्सचे हे विषाणू प्रत्येक देश व खंडानुसार रचना बदलत असल्याने हा रोग उपचार करण्यास अवघड आहे, त्यामुळेच रेट्रोव्हायरसेस सतत अंतर्गत रचना बदलत असतात.
प्लॉस पॅथोजेन्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

’लेंटिव्हायरसेस हे आफ्रिकेतील नरवानरात होते.
’विषाणूंना प्रतिकार करणारे ट्रिम ५ जनुक उत्क्रांत.
’एचआयव्हीच्या काही विषाणूंना प्रतिकारात ट्रिम ५ चा मोठा वाटा.

Elders Recreate Butterfly Song Dance cute video goes Viral
आयुष्य हे मनसोक्त जगावं! ‘बटरफ्लाय’ गाण्यावर वृद्ध लोकांचा भन्नाट डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, VIDEO व्हायरल
Inspiring story of Mumbai's varun sawant who is autistic chef and ultra marathoner
गोष्ट असामान्यांची Video: ऑटिस्टक शेफ आणि अल्ट्रा मॅरेथॅानर वरुण सावंतचा प्रेरणादायी प्रवास
vladimir putin threatens nuclear war
युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यास जागतिक अण्वस्त्र संघर्षांचा पुतिन यांचा इशारा
job opportunity in indian navy
नोकरीची संधी : इंडियन नेव्हीमधील भरती