* यापुढे कडक कारवाई करण्याचे ब्राऊन यांचे संकेत
जम्मू-काश्मिरमधील प्रत्यक्ष सीमारेषेवर पाकिस्तानकडून होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन हे सहन करता येण्याजोगे नाही,असे एअर चीफ मार्शल एन.के.ब्राऊन यांनी स्पष्ट केले आहे. येत्या काळात जर पाकिस्तानकडून असेचं सुरू राहीले,तर भारताला कडक उपाय योजावे लागतील असे खडेबोलही त्यांनी पाकिस्तानला सुनावले. ब्राऊन म्हणाले, “दोन्ही देशांची सीमारेषा आहे, शस्त्रसंधीचा करारही झाला आहे. देशाचे सरंक्षण करण्याची काही विशिष्ट तत्वे असतात आणि त्यांचे उल्लंघन सहनकरण्याजोगे नाही. जर हे असेच चालू राहीले, तर याचे उत्तर देण्यासाठी आम्हाला वेगळा उपाय करावा लागेल”
एअर चीफ मार्शल ब्राऊन हे सध्या देशातील सुरक्षा दलातील सर्वांत ज्येष्ठ अधिकारी आहेत. पाकिस्तानी लष्कराने दोन भारतीय जवानांची हत्या केल्याप्रकरणावरून राजकीय नेतृत्वाला तुम्ही कोणता सल्ला दिला याबद्दल विचारले असता ब्राऊन यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता पर्याय भरपूर आहेत. या पर्यांची जाहीर चर्चा करणे योग्य नाही, पण शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूचं राहिले तर याकडे आम्ही वेगळ्या दृष्टीकोनातून पाहता येऊ शकते आणि योग्य तो निर्णय आम्ही घेऊ शकतो असे स्पष्ट केले.
तसेच लष्करात दाखल होऊ इच्छिणा-या तरूणांना सल्ला देताना, लष्कर नेहमी अशा इच्छुकांचे स्वागतचं करेल आणि त्यांची सर्वतोपरी काळजी तसेच लष्करीमोहीमेवेळी योग्य त्या सर्व वस्तूंचा पूरवठा देखील लष्कर करेल असा विश्वास ब्राऊन यांनी व्यक्त केला