सध्या आपण टीव्हीवर अनेक डिओडरंटच्या जाहिराती पाहतो पण त्यातील घटकांचा विचार केला तर शरीरावर त्याचे अनेक दुष्परिणाम होतात, त्यातील घामाला रोखणारे डिओडरंट तर नैसर्गिक प्रक्रियेच्या विरुद्ध काम करीत असतात. अशातच आता अमेरिकी संशोधकांनी एक वेगळे डिओडरंट शोधून काढले आहे ते अंगावर फवारावे लागत नाही तर औषधासारखे सेवन करता येते व नंतर काही तासांनी तुमच्या अंगाला गोड सुगंध येऊ लागतो. तो गुलाबासारखा असतो शब्दश: अर्थाने बाह्य़सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्यावर भर देणारे हे डिओडरंट आहे. डिओ परफ्युम कँडी या कंपनीने हे डिओडरंट (दरुगधनाशक) तयार केले आहे. ते सेवन केल्यानंतर काही तासातच तुमच्या शरीरात गुलाबाचा वास त्वचारंध्रातून बाहेर पडतो, असे डेली मेलने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. पुढील वर्षी इंग्लंडमध्ये हे डिओडरंट सादर होत असून त्याचे स्वरूप टँगरिनची चव दिलेली कँडीस्वरूपातील मिठाई असे आहे. ते सेवन केल्यानंतर पुढचे सहा तास तुमच्या शरीरातून गुलाबाचा सुगंध येतो व त्यामुळे घामाचा दरुगध जाणवतही नाही.
गुलाबाचा सुगंध देणारा असा कुठला घटक त्यात आहे याच विचार केला तर त्यात गेरानिऑल हे संयुग आहे, ते गुलाब, लॅव्हेंडर व व्हॅनिला या वनस्पतीत असते.    

काय आहे वेगळेपण
* सध्याचे कुठलेही दरुगधनाशक पोटात सेवन केले जात नाही, हे दरुगधनाशक सेवन करता येते.
* गुलाब, लॅव्हेंडर व व्हॅनिला यातील गेरानिऑल हे संयुग यात असते.
* सहा तास तुमच्या शरीरातून गुलाबाचा वास दरवळतो.

 सध्याच्या दरुगधनाशकांना नैसर्गिक पर्याय
* बाजारात सध्या दरुगधनाशकांची अनेक उत्पादने आहेत पण त्यातील अगदी नगण्य सुरक्षित आहेत. कारण त्यात अ‍ॅल्युमिनियम असते, ज्यामुळे कर्करोग होतो.
* नैसर्गिक दरुगधनाशकात लिंबाच्या फोडी, अल्कोहोल यांचा समावेश होतो. ज्यांना ते घरी तयार करायचे असेल त्यांनी एक चतुर्थाश कप बेकिंग सोडा, एक चतुर्थाश कप मका स्टार्च व पाच चमचे खोबरेल तेल यांचे मिश्रण करून ते वापरावे. हानिकारक नसलेले जे दरुगधनाशक आहेत त्यात पोटॅशियम अ‍ॅलम, किस माय फेस, जॅसन यांचा समावेश आहे.