नारळाच्या स्वादाचे अननस ऑस्ट्रेलियात विकसित

नारळाचा स्वाद असलेली अननसाची जगातील पहिली प्रजात ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांनी तयार केली आहे. क्वीन्सलँड कृषी

मेलबर्न, पीटीआय | December 5, 2012 06:22 am

नारळाचा स्वाद असलेली अननसाची जगातील पहिली प्रजात ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांनी तयार केली आहे.
क्वीन्सलँड कृषी संशोधन केंद्राने ही प्रजात बनवली असून गेली दहा वर्षे अननसाची ही प्रजात विकसित करण्यावर संशोधन सुरू होते. व्यावसायिक पातळीवर नारळाच्या चवीचे अननस उपलब्ध होण्यास आणखी दोन वर्षे लागतील असा अंदाज आहे.
एबीसी या वृत्तसंस्थेला फलोत्पादन तज्ज्ञ गार्त सेनेवस्की यांनी सांगितले, की नारळाची चव असलेले ही अननसाची प्रजात आम्ही विकसित केली आहे. व्यावसायिक पातळीवर त्याचे उत्पादन लवकरच सुरू केले जाईल. कुठलीही नवीन प्रजात व्यावसायिक पातळीवर आणण्यात दहा वर्षे लागतात. या अननसाची ही वेगळी चव त्याला लोकप्रियता मिळवून देईल यात शंका नाही. ऑस्ट्रेलियातील अननस महोत्सवात या प्रजातीने पारितोषिक पटकावले असून जगात कुठेही नारळाच्या स्वादाचे अननस मिळत नाही. ते गोड आहे. त्यात आम्लाचे प्रमाण कमी आहे, ते रसाळ आहे. आम्ही जेव्हा या प्रजातीचे विकसन करीत होतो त्या वेळी आम्ही नारळाच्या स्वादाचे अननस तयार करण्याचा हेतू नव्हता.

First Published on December 5, 2012 6:22 am

Web Title: australian researchers develop coconut flavoured pineapple