भाजप पक्षात नेतृत्वाचा अभाव असल्याने खुद्द पंतप्रधानांना रणांगणात उतरावे लागले आहे. मोदी यांच्या नावावर आता पंचायत निवडणुकही लढवल्या जातील असे म्हणत नितीश कुमार यांनी आज पंतप्रधानांच्या बिहारमधील सभांची खिल्ली उडवली. विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारमधील नवाडा येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. पहिल्या टप्प्यातील मतदान सोमवारी होणार असून त्यासाठीचा प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस होता.
आमच्यामध्ये एकता आहे. लालू प्रसाद, कॉंग्रेस आणि आम्ही मिळून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरविला आहे. आम्ही सोबत निवडणुक लढवित आहोत. मात्र बिहारमधील भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारच नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाखाली निवडणुक लढविण्यात येत असल्याचे सांगत त्यांनी राज्यनेतृत्वावर टीका केली. तसेच, बिहारशी गोमांसच्या मुद्द्याचे काहीही देणेघेणे नसताना मोदी विनाकारण सभांमध्ये या मुद्द्यावर बोलत असल्याचेही त्यांनी म्हटले.