स्वत:च्या पाच वर्षीय तान्हुलीला वडिलांनीच ओठ, नाक आणि हनुवटीवर जखमा केल्यानंतर सरकारी रूग्णालयात आज तिचा मृत्यू झाला.
काल (मंगळवार) रात्री मुलीच्या आईने अंगावर दूध पाजल्यानंतर त्या मुलीची प्रकृती अधिकच खालावली होती. दूध तिच्या फुफ्फुसात जाऊन तिला अधिकच त्रास होऊ लागल्यामुळे शेवटी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, पण अखेर तीचा मृत्यू झाला, अशी माहिती सवाई मान सिंग रूग्णालयाच्या प्रवक्त्यांनी दिली. मुलीला १ फेब्रुवारी रोजी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या घटनेनंतर ३६ वर्षीय पित्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
१ फेब्रुवारी रोजी सवाई मान सिंग रूग्णालयात मृत मुलीवर तब्बल पाच तास प्लास्टिक सर्जरी करण्यात आली होती. त्यानंतर ती चांगल्या प्रकारे श्वासोच्छवास करत आणि पदार्थ गिळत होती. मात्र बुधवारी सकाळी तिची प्रकृती अधिकच खालावल्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.    
आरोपी बहादूर सिंह हा ट्रक चालक म्हणून काम करायचा. मात्र, अपघातात हात गमावल्यानंतर त्याने शेत कामगार म्हणून काम करायला सुरूवात केली होती. मृत मुलीच्या तीन वर्षांच्या बहिणीलाही आरोपीने पाठीवर आणि हाताला मारहाण केली असून तिलासुध्दा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या हाताला झालेल्या दुखापतीला संसर्ग झाला आहे.    
२४ जानेवारीच्या रात्री आरोपी दारूच्या नशेत घरात आला आणि त्याने पत्नीला काहीतरी काम करायला सांगितले. मात्र, आपल्या हाताला मेहंदी असल्याने
तिने त्याला थांबायला सांगितले. त्यानंतर त्याने आपल्य़ा पत्नीला मारहाण करण्यास सुरूवात केली. दरम्यान त्यांची तीन वर्षीय मुलगी मधे पडल्याने आरोपीने तिच्या पाठीला आणि हाताला दुखापत केली.
या गोंधळाने पाच महिन्याची चिमुकली जागी झाली आणि रडायला लागली. तेव्हा आरोपी तिच्याकडे धावत गेला आणि त्याने तिच्या नाकाला, ओठाला दुखापत केली.
त्यानंतर पत्नी त्या रात्री आपल्या मुलींना घेऊन शेतात जाऊन लपली. दुस-या दिवशी तिने एका समाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने पोलिसामध्ये तक्रार दाखल केली. तेव्हापासून तीच्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाद टाकत आहेत.   
अखेर पाच वर्षाच्या चिमुकलीचा आज रूग्णालयातच मृत्यू झाला.