अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रस्त्याशेजारी झालेल्या बॉम्बस्फोटात किमान १० नागरिक ठार झाल्याचे देशाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.
काहीजणांना घेऊन एक व्हॅन रस्त्यावरून जात असताना, रस्त्याशेजारी नुकत्याच पेरलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन व्हॅनमधील किमान १० जण ठार, तर सातजण जखमी झाले. अफगाण सुरक्षा दलांवर नेहमीच हल्ले करणाऱ्या सक्रिय घुसखोरांचे प्राबल्य असलेल्या तगाब जिल्ह्य़ात हा हल्ला झाला.