माणूस हा अन्य प्राण्यांपेक्षा बुद्धीमान प्राणी आहे. मानवी मेंदू हा अन्य प्राण्यांपेक्षा तल्लख असतो. आपला मेंदू इतका तल्लख आणि विकसित कसा याबाबतचे कोडे मानवालाच अद्याप पूर्णपणे उलगडलेले नाही. त्यामुळेच मानवी मेंदूविषयक नव-नवीन संशोधने नेहमी पुढे येताता. स्पेनच्या बार्सिलोना विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी तर कबरेदके (काबरेहायड्रेट्स) आणि त्यातही पिष्टमय पदार्थाचा (स्टार्च) आपल्या मेंदूच्या विकासात मोठा वाटा आहे, असे नवे संशोधन पुढे आणले आहे. बार्सिलोना विद्यापीठाच्या ‘कॅटलान इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीज’ येथील संशोधक कारेन हार्डी आणि साहाय्यकांनी या विषयावर संशोधन केले असून ते ‘द क्वार्टर्ली रिव्ह्य़ू ऑफ बायोलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.  आजवर असे मानले जात असे की मानवी आहारात जेव्हापासून प्राणिजन्य प्रथिनांचा वापर (मांसाहारातून मिळणारी प्रथिने) होत गेला तेव्हापासून माणसाच्या मेंदूचा आकार वाढण्यास सुरुवात झाली. माणसाच्या एकूण ऊर्जेच्या गरजेपैकी २५ टक्केऊर्जा एकटय़ा मेंदूद्वारे खर्च केली जाते, तर रक्तातील एकूण शर्करेपैकी (ब्लड ग्लुकोज) ६० टक्केशर्करा मेंदूसाठी खर्च होते. गर्भधारणा आणि प्रसूतीनंतर मुलांना पाजण्यासाठी दूध उत्पन्न करणे या प्रक्रियेत तर ऊर्जा आणि शर्करेची गरज आणखी वाढते. इतक्या मोठय़ा प्रमाणात शर्करेचा पुरवठा केवळ प्रथिनयुक्त आहारातून होणे शक्य नाही. त्यामुळे शास्त्रज्ञांनी आपला होरा कबरेदके आणि पिष्टमय पदार्थयुक्त आहाराकडे वळवला.
मानवाला पूर्वी फळे आणि कंदमुळे यातून कबरेदकांचा पुरवठा होत असे. पण ती मूळ स्वरूपात पचवणे अवघड होते.
आगीचा शोध लागून अन्न शिजवून खाण्याची पद्धत कळल्यापासून कबरेदके आणि पिष्टमय पदार्थ पचवणे सोपे जाऊ लागले. या पचनाच्या क्रियेत लाळेतील अमायलेज तयार करणाऱ्या जनुकाची भूमिका महत्त्वाची होती.  गेल्या ८ लाख वर्षांत शरीरात अमायलेज तयार होण्याची प्रक्रिया आणि मेंदूचा आकार वाढत जाण्याची प्रक्रिया समांतरपणे विकसित होत गेल्या. अमायलेजच्या उपलब्धतेमुळेच आपल्याला पिष्टमय पदार्थ पचवता येऊन शरीरात इतक्या प्रमाणात ऊर्जानिर्मितीसाठी शर्करा निर्माण करता येऊ लागली. त्यातूनच मेंदूचा आकारही वाढत गेला, असे या शास्त्रज्ञांचे मत आहे.

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स