मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापम) घोटाळ्याच्या तपासात सीबीआयने भरीव प्रगती केली असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी समाधान व्यक्त केले.
तपासाचा सद्य:स्थिती अहवाल पाहिल्यानंतर, सीबीआयने या प्रकरणांमध्ये भरीव प्रगती केली असल्याबाबत आम्हाला समाधान वाटते, असे या तपास संस्थेने सीलबंद लिफाप्यात सादर केलेल्या प्रगती अहवालाची पाहणी केल्यानंतर सरन्यायाधीश एच. एल. दत्तू, न्या. शरद बोबडे व न्या. अमितावा रॉय यांच्या खंडपीठाने सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने ९ जुलै रोजी हे प्रकरण हाती घेऊन तपास सीबीआयला सोपवल्यानंतर आणि तपासावर देखरेख ठेवल्यानंतर व्यापम घोटाळ्यातील मृत्यू कसे थांबले, याबाबत मला खरोखरच आश्चर्य वाटते, असे मत सरन्यायाधीशांनी आदेश देण्यापूर्वी व्यक्त केले.
सीबीआयमधील रिक्त पदे भरणे आणि नवी पदे निर्माण करणे याबाबत केंद्र सरकारने अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्यामार्फत दाखल केलेला सद्य:स्थिती अहवालही आजच्या सुनावणीत खंडपीठाने रेकॉर्डवर घेतला.
याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली, त्या वेळी व्यापम घोटाळ्याशी संबंधित ३६ व्यक्तींचा पूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले