नागपूर- मुंबई प्रस्तावित ८१९ किलोमीटर लांबीच्या एक्सप्रेस वेच्या निर्मितीसाठी सर्वतोपरी साह्य़ करण्याचे आश्वासन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याच्या शिष्टमंडळास दिले. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना या प्रकल्पाचा विस्तृत आराखडा केंद्र सरकारला सादर केला. नागपूर-मुंबई या दोन्ही मोठय़ा शहरांना जोडणारा ८१९ किलोमीटरोंबीच्या रस्ता कसा असेल, रस्त्याच्या दूतर्फा कोणत्या सोयी-सुविधा उभारण्यात येतील, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांची माहिती शिंदे यांनी गडकरी यांना दिली. रस्त्याच्या बांधकामाचे एकूण क्षेत्र, सव्‍‌र्हिस लेनसाठी सोडण्यात येणारी जागा, जमीन अधिग्रहणासाठी प्रस्तावित जागा, रस्त्याच्या दूतर्फा झाडे लावणे आदींचा आराखडा निश्चित केल्यानंतर या प्रकल्पास तातडीने मंजुरी देण्यात येईल.