ओईसीडी संस्थेच्या अहवालातील निष्कर्ष
संगणकाच्या वापराने शाळकरी मुले अभ्यासात हुशार होतात व त्यांची कामगिरी सुधारत नाही तसेच त्यांच्या गुणवत्तेत काही वाईट परिणामही होत नाही, असे मत ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (ओईसीडी) या संस्थेच्या डिजिटल कौशल्यांविषयीच्या मूल्यमापनात सांगण्यात आले. त्याबाबत एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून त्यात तंत्रज्ञानाचा जगातील शाळांमध्ये अध्ययनावर होत असलेल्या परिणामांचा विचार केला आहे.
एकतर शाळांनी अजून त्यांच्या वर्गामध्ये तंत्रज्ञानाचा वापर पूर्णपणे केलेला नाही. अजूनही डिजिटल दरी कायम आहे व मुलांना जगाशी जोडलेले राहण्यासाठी डिजिटल कौशल्ये आवश्यक असतात. माहिती व दूरसंचार तंत्रज्ञान क्षेत्रात सात देशांनी मोठी गुंतवणूक केली आहे, पण तेथील मुलांच्या शिक्षणात गणित व विज्ञान या विषयांमध्ये कुठलीही प्रगती झालेली नाही. वाचन व गणित यात मुलांनी किमान पातळी गाठणे आवश्यक आहे. त्यासाठी डिजिटल जगात समान संधी मिळणे आवश्यक आहे. केवळ उच्च तंत्राधिष्ठित उपकरणांसाठी अनुदान देणे हा त्यावरचा उपाय नाही. २०१२ मध्ये या ओईसीडी संघटनेच्या सदस्य देशांतील १५ वर्षांच्या ९६ टक्के मुलांच्या घरात संगणक होता व त्यातील ७२ टक्के मुलांना शाळेतही संगणक वापरता येत होता. मुलांचा संगणकाचा वापर जी मुले क्वचित संगणक वापरतात त्यांच्यापेक्षा जास्तच होता. जी मुले शाळेत संगणक वापरत होते त्यांची कामगिरी सामाजिक पाश्र्वभूमी व लोकसंख्यात्मक स्थान पाहता खूपच खराब होती. शाळांनी तंत्रज्ञान हे अध्यापनाशी एकात्म केले पाहिजे व शिक्षकांना चांगले वातावरण निर्माण करून दिले पाहिजे तरच ते २१ व्या शतकातील कौशल्ये मुलांना शिकवू शकतील, असे मत ओईसीडीचे शिक्षण संचालक अँड्रियस श्लेशर यांनी व्यक्त केले. तंत्रज्ञान हा केवळ ज्ञानाची उपलब्धता वाढवण्याचा मार्ग आहे. असे असले तरी शिक्षकांचे महत्त्व खूप आहे तेच विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवू शकतात. डिजिटल क्षेत्रात वंचित व सर्व साधने उपलब्ध असलेले विद्यार्थी यांची तुलना केली तरी त्यांच्या पारंपरिक वाचन कौशल्यात काही फरक नाही, मग संगणक वापरणाऱ्या विद्यार्थ्यांची पाश्र्वभूमी चांगली असली तरी
त्याचा काही संबंध शैक्षणिक कामगिरीशी नाही. डिजिटल कौशल्यातील दरी दूर करणे त्यासाठी आवश्यक आहे.
मुलांच्या डिजिटल कौशल्याच्या चाचणीत ३१ देशांच्या मुलांना की-बोर्ड व माऊस हाताळणे, टूल्सच्या मदतीने हायपरलिंक उघडणे, ब्राउजर व स्क्रॉलिंग बटन वापरणे, माहितीचा वापर करून तक्ता तयार करणे, गणकयंत्र (संगणकावरचा कॅलक्युलेटर) वापरणे ही कौशल्ये प्राप्त असणे अपेक्षित होते. त्यात सिंगापूर, कोरिया, हाँगकाँग-चीन, जपान, कॅनडा, शांघाय-चीन येथील मुलांनी चांगली कामगिरी केली. इंटरनेटवरील नेव्हिगेशन व इतर कौशल्ये ही अ‍ॅनॅलॉग पद्धतीनेही शिकता येतात.