गुजरात आणि हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात

गुजरात आणि हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार असुन. गुजरात राज्याच्या १८२

मुंबई | December 20, 2012 08:34 am

गुजरात आणि हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार असुन. गुजरात राज्याच्या १८२ जागांवर तर हिमाचलप्रदेशच्या ६८ जागांवर विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहिर होतील. गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी गेली दहा वर्षे गुजरात राज्यात सत्तागाजवत आहेत. मोदी हे यावेळची निवडणुक जिंकून आपली विजयी हॅट्रीक करतील का? यावर सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या आहेत. गुजरातच्या उमेदवारांनी पुन्हा भाजपाचीच सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. तर यावेळी जनता काँग्रेसलाचं संधी देईल अशी आशा काँग्रेसच्या उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे.

First Published on December 20, 2012 8:34 am

Web Title: counting of votes started of gujrat election
टॅग: Gujrat-election