विद्यार्थ्यांना कॅमेरा असलेले मोबाईल वापरण्यावर बंदी, असा नियम मुझफ्फरनगर येथील दारूल उलुम देवबंद या प्रसिद्ध मुस्लिम शिक्षण संस्थने विद्यार्थ्यांवर लादला दिला आहे. आणि संस्थेने विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातून १४ मोबाईल फोन देखील जप्त केले आहेत.
“यापुढे पालकांनी विद्यार्थ्यांना कॅमेरा नसलेले साधे मोबाईल वापरण्यास द्यावेत. त्या मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंची सोय नसावी. अशा कॅमेरा मोबाईलचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर दुष्परिणाम होतो”, असे या संस्थेचे उपाध्यक्ष मौलाना अब्दुल खालीक यांनी सांगितले. तसेच कॅमेरा असलेले मोबाईल फोन विद्यार्थ्यांकडे आढळल्यास त्याच्यावर संस्थेमार्फत कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे विद्यार्थ्यांना बजावण्यात आले आहे.