तेलंगणाच्या मुद्दय़ावर अंतिम निर्णय घेण्यासाठी आणखी कालावधीची गरज असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केल्यामुळे तेलंगणाविषयीचा निर्णय लांबणीवर पडला आहे.
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार िशदे यांनी तेलंगणाबाबत निर्णय घेण्यासाठी डिसेंबरमध्ये एक महिन्याची मुदत निश्चित केली होती. मात्र याबाबतचा निर्णय घेण्यास आणखी कालावधी लागणार असल्याचे त्यांनी रविवारी स्पष्ट केले. आंध्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव गुलाम नबी आझाद यांनीही स्पष्ट केले की, या मुद्दय़ावर अंतिम निर्णय घेण्यासाठी आंध्रातील इतर नेत्यांशी सविस्तर चर्चेची गरज आहे.
तेलंगणा राष्ट्रसमितीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी हैदराबादमध्ये अनेक ठिकाणी निदर्शने केली. आमदार के. ताराकरमा राव यांना  मोर्चासाठी जात असताना पोलिसांनी अटक केली.