देशभरात चिकनगुनिया आणि हिवतापाच्या रुग्णांमध्ये घट होत असतानाच डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मात्र सातत्याने आणि मोठी वाढ होत असल्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अबू हसेम खान चौधरी यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितल़े  १५ नोव्हेंबपर्यंत डेंग्यूमुळे देशभरात २१६ जणांचा मृत्यू झाला आह़े  २०११ या वर्षांत हेच प्रमाण १६९, तर २०१० मध्ये ते ११० होते, असे चौधरी यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितल़े  २०११ मध्ये डेंग्यूची लागण झालेल्यांची संख्या १८ हजार ८६० होत़े