प्रमुख क्षेत्रांमध्ये भारत व जर्मनीतील द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व जर्मनीच्या चान्सलर अँगेला मर्केल हे सोमवारी व्यापक चर्चा करणार असून त्यात व्यापार, सुरक्षा व संरक्षणविषयक संबंध वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. संरक्षण, शिक्षण, नविनीकरणीय ऊर्जा, उच्च तंत्रज्ञान, कौशल्य विकास, विज्ञान व तंत्रज्ञान, रेल्वे, पाणी आणि कचरा व्यवस्थापन, नागरी विकास आणि कृषी या क्षेत्रांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यावर या बोलण्यांमध्ये भर दिला जाण्याची अपेक्षा आहे. भारत व जर्मनी हे २००१ सालापासून महत्त्वाचे भागीदार आहेत. मोदी यांच्या जर्मनी दौऱ्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी मर्केल या तीन दिवसांच्या भारत भेटीवर येत आहेत.